अखेर इंदिरानगरत झाली नालेसफाई

मनपाने घेतली तक्रारीची दखल

 नागरिकांनी घेतला मोकळा श्वास 

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील मूल मार्गावरील इंदिरानगर वॉर्ड, प्रभाग क्र. 9 मध्ये मागील अनेक दिवसांपासून नाल्यांची स्वच्छता होत नसल्याने या परिसरात प्रचंड घाण व दुर्गंधी पसरली होती. अनेकदा तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष होत होते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते रोहित तुराणकर यांनी मनपाकडे ऑनलाईन तक्रार केली. त्यानंतर महानगरपालिकेने त्वरित दखल घेत आज 30 एप्रिल रोजी सदर प्रभागातील नाल्यांची स्वच्छता केल्याने येथील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे.इंदिरानगर परिसरात अनेक समस्या आहेत. यापैकीच स्वच्छतेची समस्या अलिकडेच गंभीर झाली होती. रखरखत्या ऊन्हात येथील नाल्या तुंबल्या होत्या. परिणामी परिसरात प्रचंड घाण व दुर्गंधी पसरली होती. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर महानगरपालिकेकडे ऑनलाईन तक्रार करण्यात आली. दरम्यान संबंधित अधिका-यांनी या तक्रारीची दखल घेत स्वच्छता कर्मचा-यांना पाठवून सदर परिसरात स्वच्छता करण्यास आजपासून सुरूवात केली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासूनची समस्या निकाली निघाली असून नागरिकांनीही दुर्गंधी पासून मोकळा श्वास घेतला आहे.ही समस्या निकाली काढण्यासाठी या परिसरातील नागरिक रोहित तुराणकर, हरिदास मेंढे, दुर्वास भडके, अमोल आत्राम, अक्षय वांढरे, देवराव कुंभरे, राजेश मोहितकर,  मंगेश कुंभरे, प्रवीण कुंभरे आदींनी प्रयत्न केले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post