✍️..निलेश ठाकरे चंद्रपुर : - जयंत टॉकीज ही चंद्रपुरातील जुण्या थेटर पैकी एक या थेटर मध्ये अनेक चित्रपट चंद्रपुरकरांनी बघीतले आहेत. शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या या चित्रपट गृहात अनेक चित्रपटांनी आपले वर्चस्व गाजवलेले आहे.
या थेटर मध्ये चित्रपटाच्या प्रमाेशन करिता अनेक हिंदी तसेच मराठी चित्रपटातिल प्रसिध्द नामवंत अभिनेत्यांनी स्वता उपस्थित राहुन जयंत थेटरला भेट दिली, असुन आपल्या प्रसिध्द कलावंतांना बघण्यास चंद्रपुरकर चिक्कार गर्दी करायचे. या चित्रपट गृहात किती तरी चित्रपट पहाटे ३ वाजताच्या सुमारास बघण्यास चित्रपट प्रेमी चित्रपट बघण्यास आतुर असायचे. प्रेक्षक वर्ग चित्रपट चाहते एक दिवस पुर्वीच अँडव्हांस बुकिंग करण्याकरिता माेठ्या गर्दीने उपस्थीत राहयचे असे प्रसंग अनेकांनी या थेटरात बघितले आहे. या चित्रपट गृहात आर्केस्ट्रा, नाटक, याची सुध्दा आयाेजन हाेत हाेते. मात्र या सर्व बाबी जुण्या आठवनीतच जमा झाल्या आहेत. आता मात्र जयंत टॉकीजच्या जागेवरती माेठ्या भव्य स्वरूपाची ( मॉल ) दहा मजली ईमारत उभी राहणार असुन त्याचे काम चंद्रपुर येथिल एका माेठ्या कंत्राटदाराला भेटले असुन त्या कामाची सुरवात सुध्दा जाेमात सुरू झाली आहे. जमिनीच्या आत दाेन फ्लाेर आणि जमिवरती आठ फ्लाेर अशी भव्य स्वरूपाची माेठी ईमारत चंद्रपुर शहराच्या अगदी मध्य भागी म्हनजे आता जयंत टॉकीजच्या जागेवर लवकरच उभी हाेईल. मात्र या ईमारतीचे काम सुरू असतांना परिसरातले नागरिक व त्या थेटरचा बाजुच्या राेडवरून जाणार्या वाहन धारकांना विनाकारण नाहक त्रास हाेत असुन या मुळे ते त्रस्त झाले आहेत. थेटरच्या बाजुने असणारा सिमेंट राेड आताच काही महिण्या पुर्वी चंद्रपुर महापालिकेकडुन बनवण्यात आला हाेता परंतु त्या राेडचे काम अत्यंत निष्क्रूष्ठ दर्ज्याचे असल्याने परत एकदा या राेडला मनपाच्या वतीने बनवण्यात आले. त्या मुळे ह्या राेडचे बांधकाम करतांना हा राेड पुर्ण पणे बंद असल्याने ये जा करणार्या नागरिक व वाहनधारकांनसाठी डाेके दुखी ठरला हाेता. मात्र पुन्हा या ईमारतीचे काम करण्या करिता मनपाच्या वतीने ह्या राेडला ब्यारिकेट लावुन चार चाकी तसेच जड वाहणांना प्रतीबंध लावुन दुचाकी वाहन धारकांसाठी सुरू ठेवण्यात आला आहे. त्या मुळे वर्ष भरा पासुन हा राेड अधुन मधुन बंद करण्यात येत आहे. नागरिकांनी महानगरपालिकेला याची तक्रार केल्यास महा पालिका मुद्दामुन याकडे दुर्लक्ष करतांना दिसते. याचे मुख्य कारण या ईमारतीत प्रत्येक फ्लाेर चंद्रपुरातील राजकिय नेते तसेस माेठे व्यापारी यांचे असल्याने महापालिकेच्या अधिकारी का बर दुर्लक्ष करतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ही ईमारत नियमबाह्य हाेत असल्याची परिसरातल्या नागरिकांचे म्हनने आहे. या ईमारतीचे काम सुरू करतांना न्यु इंग्लिश शाळेला लागुन असणार्या रसत्याच्या समाेर टिनाचे शेड उभारून बांधकामा करिता मिनीचा खाली गड्डे करण्यात आले हाेते. मात्र काही दिवसातच टिनाच्या शेडला लागुन असणारे गड्डे आत घसरले. याच टिनाच्या शेडला लागुन आठवड्याचा दर रविवारी संडे मार्केटचे दुकाने लागत असल्याने माेठी जिवित हानी हाेवु शकते. त्यामुळे हा संपुर्ण राेडच बेरीकेट लावुन बंद पाडण्यात आला आहे. म्हनुन "जयंत टॉकीजच्या जागेवर हाेणार मॉल मस्त, त्या मॉलच्या बांधकामामुळे परिसरातले नागरीक झाले त्रस्त" असेच म्हनावे लागेल.