सविता कांबळे जिल्हा सल्लागार समितीवर

चंद्रपूर : भाजपा महिला आघाडीच्या महानगर अध्यक्ष तथा माजी नगरसेविका सविता कांबळे, वरोरा पंचायत समितीच्या माजी सभापती रोहिनी देवतळे यांची जिल्हा सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरअंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह जिल्ह्यात चालविले जातात. जिल्हाभरातील विद्यार्थिनी वास्तव्यास राहून शिक्षण घेत आहेत. परंतु, मागील काही वर्षांत आश्रमशाळा, वसतिगृहातील विद्यार्थिनींसोबत गैरप्रकार घडल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाने गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सल्लागार समिती गठित करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये सहअध्यक्ष म्हणून जिल्हा सत्र न्यायाधीश समृद्धी भिष्म, उपाध्यक्ष मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन, सदस्य सचिव म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प वअधिकारी आहेत. तर, सदस्य म्हणून महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संग्राम शिंदे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी दीपक बानाईत, शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या गृहपाल शुभांगी हम्मद, गोपिकाबाई सांगडा अनुदानित आश्रमशाळा राजुराच्या मुख्याध्यापिका छाया मोहितकर यांचा समावेश आहे. राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शिफारसीनुसार आता सविता कांबळे, रोहनी देवतळे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल कांबळे, देवतळे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post