पोलीस प्रशासन मेहरबान तो अवैध सावकार भी पहेलवान..?

✍️ निलेश ठाकरे
चंद्रपूर :- रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या निर्गमीत दिशा निर्देशानुसार पंजीकृत सावकार यांना दिलेल्या मुळ रकमेवरील व्याजाचे पैसै परत घेतांना त्यावरील आकारलेले व्याजाचे पैसे शेकडा एक ते दिड टक्के प्रमाणे घेण्याचे सख्त निर्देश आरबीआय ने दिले असतांना सुध्दा त्या आदेशाला बाजूला ठेवून नाेंदणीकृत व अवैध सावकारी करणारे ५ % ,१० % ते १५ % टक्के व्याजदरांनी आकारणी करण्यात येत असल्याचे चंद्रपुर शहरात निदर्शनास येत आहे. असे असुन सुध्दा याकडे मात्र प्रशासनाचे साफ दुर्लक्ष हाेतांना दिसते. शहरातील अनेक सावकारांना राजकिय नेत्यांचे पाठबळ असल्यामुळे पिडीतांना जबरन दमदाटी करीत त्यांना धमकावुन  नोंदणीकृतांसह अवैध सावकार सुध्दा चक्रवाढ व्याज पध्दतीने पीडीतांकडुन पैसै वसुल करीत असल्याची माहिती मिळाली आहे.                                                                पाेलीस प्रशासनात तक्रार केल्यास अवैध व नाेंदणीकृत सावकारांची काही पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चांगलीच गट्टी जमलेली असल्याने उलट सावकारांच्या बाजूने पाेलीस तक्रार करणाऱ्यांवर उलटसुलट प्रश्नांचा भडीमार करीत त्यांचेवर दबाव टाकुन तक्रार कर्त्यालाच दाबण्याचा प्रयत्न करीत                         असल्याचे सावकारांच्या जाचाला कंटाळलेल्या पिडीतांचे म्हणने आहे.                                या नियमबाह्य सावकारी वसूलीला कंटाळुन अनेकांनी आत्महत्या केल्याचीही माहीती पुढे येत आहे. शहरात पुन्हा अश्या घटना घडु नये याकरीता प्रशासनानी वेळीच सावध हाेणे, अवैध सावकारी करणाऱ्यांच्या तसेच आगाऊचे अवाढव्य व्याजदर आकारणाऱ्या सावकारांच्या मुसक्या आवळणे अत्यंत गरजेचे झाले आहे.                                                                                       चंद्रपूर शहरात सद्याच्या स्थितीत नोंदणीकृत सावकार कमी व गुंड प्रवृतीचे अवैध सावकार जास्त प्रमाणात व्याजाचा व्यवसाय करीत आहेत. हेच अवैध सावकार दिलेल्या कर्जावर १५ टक्यापर्यंत व्याज दर आकारतात. व्याजाने पैसै देतांना आपले व्याजाची रक्कम सुरक्षित रहावी म्हणून (पिडीत) कर्जदारांकडून साेन्याचे आभुषण, प्लॉट, घर, शेती यांसारखी मालमत्ता गहाण ठेवुन, त्यांचेकडून सही केलेले कोरे चेक, सही घेतलेले कोरे स्टॅंप पेपर्स ठेवून घेतात. त्यानंतर  आपल्या नावाने रितसर रजिस्ट्री करून घेतात. कर्जदाराने व्याज न दिल्यास त्यांची मालमत्ता हडपण्यात येत असते. अश्या घटना कित्येक पीडीतांबराेबर घडलेल्या असुन यासंबंधी पिडीतांची साधी तक्रार सुध्दा घेण्यात येत नसल्याचे सत्य काही पिडीतांकडून उघडकिस आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सर्वत्र                                                         नाेंदणीकृत व अवैध सावकार जिल्ह्याच्या आपल्या दबंगगिरीने, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वसुलीसाठी हाताशी धरून सावकारीचा व्यवसाय जोमाने करत आहेत.                                                               पाेलीस प्रशासनानी या सर्व सावकारांची रितसर चाैकशी करून पीडीतांना न्याय द्यावा अशी मागणी काही कर्जदारांनी व पीडीतांनी शासन प्रशासनाला वारंवार केलेली आहे. परंतु याकडे लक्षच दिले जात नसुन सावकारी करणारे राजकारणी पुढाऱ्यांच्या जवळचे असल्याने पाेलिसही तक्रार करणाऱ्यांनाच दम देवुन व्याज देण्याचे कबुल करून घेत असल्याची परिस्थिती सद्या चंद्रपुर शहरात माेठ्या प्रमाणात सर्वत्र दिसुन येत आहे. आधीच व्यवसाईक व नाैकरदार वर्ग हताश निराशाजनक आयुष्य जगत आहे. त्यात सावकार अश्याच लाेकांना कर्ज देवुन आपला गल्ला जमवण्यात व्यस्त आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने कुठेतरी अश्या अवैध सावकारांवर अंकुश लावणे अगत्याचे झाले आहे. किंबहूना यातून माेठी जिवितहानी हाेण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
Post a Comment (0)
Previous Post Next Post