चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त वाल्मिकी आणि सुदर्शन समाजातर्फे जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. समाजसेवेच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना पोषणाची आवश्यक भर देण्यासाठी फळांचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून भाजप युवा मोर्चा महानगर महामंत्री प्रमोद क्षीरसागर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पारस पिंपळकर, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष मनोज पोतराजे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष चांद सय्यद, बाजार मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार यांची विशेष उपस्थिती होती. याशिवाय समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रुग्णालयातील विविध वॉर्डांमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली आणि त्यांना फळे दिली. या समाजसेवी उपक्रमाच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.वाल्मिकी आणि सुदर्शन समाजाच्या या उपक्रमाचे नेतृत्व करणारे राहुल पावडे यांनी सर्वांचे आभार मानले आणि समाजातील अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. त्यांनी या उपक्रमामुळे समाजसेवेची भावना वृद्धिंगत होईल, असेही नमूद केले.कार्यक्रमाच्या सांगतेस रुग्णांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. या वेळी वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष राज खोडे, आतिश हटवाल, रितेश खोडे, अर्जुन दुलगज, शक्ती हटवाल, अमर दुलगज, बालू मडावी, साजन सारसर, मनीष शुक्ला, विक्रम महातव, भरत बिरिया, मोनीषा महतव, अनिल खोटे आणि शैलेश महातव आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.