चंद्रपूर:- चंद्रपूर -मूल महामार्गावर आज सकाळी मामला डेपो जवळ वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक 395 मध्ये एका मोठ्या नर रानगव्याचा जवळपास 850 किलो वजन असलेल्या, एका कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.चंद्रपूर - मूल महामार्ग क्रमांक 930 ह्या महामार्गावर अनेक वन्यप्राण्यांचे अपघातात आजपर्यंत अनेक वन्यप्राण्यांचे मृत्यू झाले आहे, नुकत्याच केसलाघाट जवळ, हनुमान मंदिर जवळ, के मार्क वाघीणीच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे, अजूनही वनविभागाने DNA ला पाठवलेल्या नमुन्याचे काय झाले हे जाहीर केले नाही, पण वाघीण चवताळून महामार्गावरुन जाणाऱ्या येणाऱ्या लोकांवर हल्ले करतांनाचे विडिओ वायरल झाले होते.ह्या चंद्रपूर - मूल महामार्ग क्रमांक 930 वर आज पर्यंत, लोहारा भागात 5 रानगवे तर एक रानगवा डोनी फाट्याजवळ एका रानगव्याचा समावेश आहे असे हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी चे अध्यक्ष दिनेश खाटे यांनी सांगितले तर इतर वन्यजीवांचे तर रोज अपघात होत असल्याचे सांगत होते, ह्या महामार्गावरुन जातांना ऐकणा एक वन्यजीव रोज रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतो.चंद्रपूर - मूल महामार्ग क्रमांक 930 हा कावल व्याघ्र प्रकल्प -कन्हाळगाव अभयारण्य- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प-उमरेड कऱ्हाडला चा वन्यजीव भ्रमनमार्ग असून, वाईल्ड लाइफ कंझर्वेक्षण ट्रस्ट यांच्या अंतर्गत वनविभागसोबत मिळून रोड इकॉलॉजिस्ट मिलिंद परिवाकाम यांनी उपशमन योजना सुचविल्या होत्या सोबतच कोठारी - आकसापूर ह्या महामार्गवर सुद्धा उसशमन योजना सुचविल्या आहे, त्या मंजूर होऊनही फक्त पैसे नसल्याचे कारण देऊन हा महामार्ग अजूनही रखडला आहे व त्याचाच नकारात्मक प्रभाव हा वन्यजीवानवर पडत असल्याचा दिसत आहे, राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत हा महामार्ग येत असून, हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी चे अध्यक्ष दिनेश खाटे यांनी अनेकदा पत्र व्यवहार करून महामार्गा लगतचा कचरा साफ करण्यास सांगितले पण त्यांनी कुठलीही दाखल न घेतल्याने आज पुन्हा एकदा रानगव्याला रस्ते अपघातात जीव गमवावा लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने आता तरी लवकरात लवकर उपशमन योजना वन्यजीवासाठी रबवाव्या जेणेकरून वन्यजीव सुरक्षित भ्रमन करू शकतील.घटनास्थळी हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी चे अध्यक्ष दिनेश खाटे, नाजिश अली, अमित देशमुख, रणवीर गौतम, राहील अली वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनालकर, क्षेत्र सहाय्यक कबले, वनरक्षक मत्ते, पशुवैदकीय अधिकारी कुंदन पोडसेलवार हे उपस्थित होते.