नगर प्रशासन लक्ष देईल काय?: प्रमोद क्षीरसागर
चंद्रपूर : चंद्रपूर येथील सराई वार्ड सपना टॉकीज मागील परिसरात लावारिस मोकाट कुत्र्यांच्या त्रासामुळे येथील नागरिकांमध्ये दशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.काही दिवसा अगोदर येथील शाळा करू मुलांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे .तेव्हा नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्या मुलाचा जीव वाचला असे प्रत्यक्षदर्शी यांचे म्हणणे आहे.याच परिसरात बकरी चरत असताना अत्यंत कुरपणे कुत्र्यांनी लुचु लुचु खाल्ल्याचे सदर फोटो वरून सिद्ध होते.तेव्हा नागरिकांनी नगरप्रशासनास विनंती केली आहे.मनपा वतीने वतीने या लावारिस मोकाट कुत्र्याचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा जेणेकरून दुर्दैवी घटना होणार नाही सदर बाब गंभीर असून ताबडतोब कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी जोर धरीत आहे.