वाघाचा हल्ल्यात इसमाचा मृत्यू

विनोद देवईकर
बल्लारपूर: - बल्लारपूर लगतच्या  कोर्टी मक्ता येथील बकरी चालणाऱ्या एका इसमावर वाघाने हल्ला करून   ठार केले बल्लारपूर तालुक्यातील  कोर्टी मक्ता  येथील रहिवासी वामन गणपती टेकाम वय 59 हा सकाळी 8.30 वाजताचे दरम्यान लगतचा जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घालून हल्ला केला त्यात वामन याचा मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे आहे की , कोर्टी मक्ता येथील रहिवासी वामन हा सकाळी बकऱ्या चरण्यासाठी लागतचा जंगलात जात असताना गस्तीवर असलेले वन कर्मचारी ह्यांनी त्याला जंगलात जाण्यासाठी मज्जावं केला व गावाकडे परत पाठविले. गस्ती कर्मचाऱ्यांना समोर जाऊ देऊन वामन हा  बल्लारपूर वनपरिक्षेत्र नियत क्षेत्र कळमना येथे पुन्हा बकऱ्या घेऊन चारायला निघून गेला.इथे दबा धरून बसलेल्याा वाघाने संधि बघून वामन वर हल्ला केला त्यात   वामन चा जागी मृत्यू झाला. याची माहिती वनविभागाला मिळतात तात्काळ   घटनास्थळी जाऊन  म्रुत्तकाचा नातेवाईका समोर पंचनामा केला.मृतकाचे शव, शवविच्छेदनासाठी स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पुढील कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश   भवरे बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post