बल्लारपूर :- वनपरिक्षेत्रात सफारी जंगलामध्ये दोन वाघाच्या झुंजीत एका अडीच वर्षीय वाघाचा मृत्यू झाल्या की घटना आजउघडकीस आली.आज दिनांक 13 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता चे सुमारास सफारी परिक्षेत्र कक्ष क्रमांक 510 नियत क्षेत्र किडनी येथे वन विभागाचे कर्मचारी गस्त घालितअसताना एक अडीच व वर्षीय वाघाचा मृतदेह आढळला.घटनेचा पंचनामा करण्याकरिता घटनास्थळी प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव यांचेप्रतिनिधी मुकेश भांदक्कर व राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण प्रतिनिधी बंडू धोत्रे यांना बोलवून घटना पंचनामा नोंदवून वन्यप्राणी संरक्षण अधिनियम 1972 अन्वयेे प्राथमिक वन गुन्हा दाखल करण्यात आला. मृत वाघाचे श्रव ताडोबाा येथील वन्य जीव उपचारकेंद्र येथे शवाविच्छेदनासाठी नेण्यात आले.पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.