भगवान परशुराम जन्‍मोत्‍सवानिमीत्‍त निघालेल्‍या शोभायात्रेचे भाजपातर्फे भव्‍य स्‍वागत

चंद्रपूर :- भगवान परशुराम यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमीत्‍त समाजातर्फे चंद्रपूरात काढण्‍यात आलेल्‍या शोभायात्रेचे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनात व चंद्रपूर भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात दिनांक १० मे  रोजी सायंकाळी ७ वाजता गिरनार चौक येथे भगवान परशुराम यांच्या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. 
शोभायात्रेत आलेल्या सर्व समाज बांधवांना लोकनेते विकास पुरुष ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यातर्फे फ्रुटी वाटप करण्यात आले. भगवान परशुराम  यांचा जयजयकार करणा-या घोषणांनी यावेळी परिसर निदावून गेला होता. चंद्रपूर भाजप महानगर अध्यक्ष राहूल पावडे, महानगर यांनी भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे,प्रज्वल कडू, ब्रिजभूषन पाझारे, मंगेश गुलवाडे, सुभाष कासानगोटूवार शीला चव्हाण सचिन कोतपल्लिवार दिनकर सोमलकर रव लोणकर अजय सरकार धनराज कोवे कृष्णा चंदावार प्रलय सरकार विठल डुकरे चांद सयद संदीप देशपांडे मंजुश्री कासनगोटूवार अमीन शेक उमेश आष्टांकर रामकुमार आकपल्लिवार शाम बोबडे गणेश रासपायले सुशांत शरमा आदी भाजपा पदाधिका-यांसह मोठया संख्‍येने भाजपा कार्यकर्ते या स्‍वागताप्रसंगी उपस्थित होते.
Post a Comment (0)
Previous Post Next Post