*पाेलिस प्रशासन असते काेमात, सुगंधित तंबाखू,गुटख्याची जिल्ह्यात विक्री सुरू जाेमात.

राज्यात बंदीचा आदेश फक्त कागदावरच आहे, युवकांचे आरोग्य ! मात्र धोक्यात  

✍️...निलेश ठाकरे                                  चंद्रपुर :- चंद्रपुर जिल्ह्यात, तालुक्यात सुगंधित तंबाखू,गुटखा हा धडाक्याने विक्रीचा व्यापार जाेमात सुरु आहे. चंद्रपुर जिल्यातील चंद्रपुर,बल्लारपुर,राजुरा,गढचांदुरकाेरपना,गाेंडपिपरी, मुल,सावली, सिंदेवाही,ब्रम्हपुरी, भद्रावती,वराेरा, घुग्घुस या शहरातिल युवक वर्ग माेठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाखु चे सेवन करित असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. राज्य शासनाने सुगंधित तंबाखू, गुटखा यावर राज्यात बंदी घातली असतांना चंद्रपुर जिल्ह्यात मात्र या बंदीवर सुंगधित तंबाखु तस्करांवर पाेलिस प्रशासनाच कुठलेच वचक दिसुन येत नाही. राज्यात जनतेनी  गुटखा,सुगंधित तंबाखू चे सेवन बंद करावे म्हणून शासन तर्फे प्रबाेधात्मक तसेच जाहिरातीच्या माध्यमातुन वेगवेगळे कार्यक्रम राबवुन युवक वर्गांना मार्गदर्शन कार्यक्रम राबविले जात असतात. परंतु चंद्रपुर, बल्लारपुर येथिल माेठ्या तंबाखु तस्करांनकडुन लाहान तंबाखु विकणार्या व्यवसाईकांना इतर तालुक्यात दररोज चौहीकडे सुगंधित तंबाखू व गुटखा  दोनचाकी व चारचाकी वाहणाने  मध्यरात्री  पुरवण्यात येत असते. अशी जनतेत दबक्या आवाजात चर्चा आहे. परंतु जिल्ह्यातिल, तालुक्यात सर्व मुख्य शहरात गुटखा, सुगंधित तंबाखू येते कुठून असा प्रश्न चिन्ह? उदभवायलाच नकाे आहे ? कारण हा "अवैधरित्या सुरू असलेला धंदा, काेन करताे बंदा" हे पाेलिस प्रशासनाला व स्थानिक गुन्हे शाखेला माहित नसेल हे शक्यच नाही. अनेकदा लाखाे रूपयाचा मुद्देमाल सहित सुगंधित तंबाखु हा कागदावर दाखवण्या पुरताच पकडला जाताे. परंतु तंबाखु तस्करांना या कारवाहीचा काहीच फरक पडत नसताे. पाेलिस प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखे मार्फत या पुर्वी ही अनेकदा कारवाही झाली आहे. यात चंद्रपुरातिल काही तस्करांना जेरबंद सुध्दा करण्यात आले हाेते. तरि सुध्दा तंबाखु तस्कर पुन्हा आपला व्यवसाय जाेमात करतांना दिसुन येतात. असा संशय जनतेतुन निर्माण केला जात आहे. मात्र जिल्ह्यातिल युवक वर्ग तंबाखू सेवन करित कर्कराेगाचा ( केंसर ) आजार हाेणार्या जहरचे निरंतर सेवन करित आपले आरोग्य धोक्यात टाकत आहेत. राज्य शासनाच्या गुटखा,सुगंधित तंबाखूवरच्या बंदीचे आदेश फक्त नावापुतेच दिसुन येत आहे. चंद्रपुर तालुक्यात प्रत्येक ठीकानी गुटखा व सुगंधित तंबाखू धुम धडाक्याने विकले जात आहेत. प्रशासनाला ते  कदाचित दिसत नसतिल किंवा दिसुन व माहिती असुन ही पालिस प्रशासन बघ्याची भुमिका घेत आहे असेच समजावे लागेल. प्रशासनानी जिल्ह्यात त्वरित सुगंधित तंबाखू व गुटखा तस्करांवर निर्बंध लावण्याची अत्यंत आवश्यकता आहे, अशी जनतेतुन मागणी हाेत आहे. कुठे तरि पाेलिस प्रशासन "लबाड लाडंग ढाेंग करतय की साेंग करतय" याच भुमिकेत सध्या दिसुन येत आहे. 
 *आपला जिल्हा उडता चंद्रपुर हाेण्याचा मार्गावर*                                                      सुगंधी तंबाखु विक्रीवर बंदी असुन सुध्दा चंद्रपुर जिल्ह्यात सुगंधी तंबाखू ची तस्करी जाेमात सुरू दिसुन येते. जिल्ह्यात या पुर्वी अवैधरित्या सुगंधी तंबाखु तस्करी करतांना अनेकदा लाखाेचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. परंतु पाेलिस प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखे मार्फत केलेली कारवाही ही केवळ नाममात्र कागदाेपत्री दाखवण्या करिताच असते की काय अशी चर्चा दबक्या आवाजात चंद्रपुर महानगरात  हाेतांना दिसते. चंद्रपूर जिल्ह्यात  आजही सुगंधी तंबाखू चे व्यापारी काेन आहेत अवैधरित्या तस्करी मार्फत सुगंधित तंबाखुचा माल जिल्ह्यात कसा काय पाेहचवला जाताे ह्या सगळ्या बाबीची माहिती स्थानिक गुन्हे शाखा विभाग तसेच पाेलिस प्रशासनाला चांगलेच ठाऊक असुन ही अवैधरित्या सुगंधी तंबाखुची तस्करी जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात कशी काय हाेते ? याचे उत्तर मात्र अजुन पर्यंत तरि प्रशासनाला मिळत नसल्याचे प्रमाण समाेर आले आहे. या पुर्वी ही नऊ लाखाचा माल जप्त करण्यात आला हाेता. बल्लारपूर येथे एक कोटींचा सुगंधीत तंबाखू पकडल्याचे प्रकरण ताजे असतांनाच दुर्गापूर येथे लाखाे रुपयाचा सुगंधीत  तंबाखू पकडण्यात आला हाेता. चंद्रपुर जिल्ह्यात वाहतूक पोलिसांनकडुन सुध्दा लाखाे रूपयांचा अवैध सुंगधित तंबाखु जप्त करण्यात आला हाेता. या कारवाईमध्ये दोन तस्करांना सुध्दा अटक करण्यात आली हाेती.  दुर्गापूरकडून चंद्रपुरात येणाऱ्या एका वाहनामध्ये नाका बंदी दरम्यान चौकशी करतांना सुगंधीत तंबाखुचा मुद्देमॉल सापडला हाेता. मध्यरात्री केल्या गेलेल्या कारवाईमुळे अनेकांचे तेव्हा धाबे दणाणले हाेते. मात्र तस्करांचे धाबे हे काही दिवसा करिताच असते. माेजके दिवस गप्प राहु मग पुन्हा सुरू हाेताे तंबाखु तस्करांचा लपंडावाचा खेळ. "रात्रीच सखे चाले हा खेळ सावल्याचा संपेना कधी हा खेळ तंबाखु तस्कंराचा" याच मुळे चंद्रपुर उडता चंद्रपुर हाेण्याचा मार्गावर वाटचाल करतांना दिसुन येताे. चंद्रपुर नगरी जरि ऐतिहासिक नगरी असली तरि नैसर्गिक ताडाेबा जंगल हा संपुर्ण जगात प्रसिध्द आहे. मात्र सुगंधीत तंबाखुला राज्यात प्रतीबंध असतांना माेठ्या प्रमाणात तरूण वर्ग सुगंधीत तंबाखुचे सेवन करतांना दिसतात. चंद्रपुर जिल्ह्यात ज्या प्रमाणे दारूबंदी असतांना दारूची खरेदी, विक्री व तस्करी हाेत हाेती. त्याच प्रमाणे सुगंधीत तंबाखुची खरेदी विक्री माेठ्या प्रमाणात हाेत आहेत अशी दबक्या आवाजात चंद्रपुरकरात चर्चा हाेतांना दिसुन येते.
Post a Comment (0)
Previous Post Next Post