काही तासांत 8 आरोपींना अटक



वर्ध्याकडे जाताना टोलनाक्यावर पकडले

चंद्रपूर :-घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंहसिंह परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. एलसीबीचे पीआय बाळासाहेब खाडे यांनी एपीआय संदीप कापडे, मंगेश भोयर, जितेंद्र बोबडे, अतुल कावळे यांच्यासह 4 टीम तयार केल्या. या प्रकरणातील संशयित आरोपी एमएच 04 जीझेड 9091 क्रमांकाच्या स्कॉर्पिओमधून वर्धा जिल्ह्याच्या दिशेने पळून जात असल्याची गुप्त माहिती एलसीबीला मिळाली. माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या टिमने संबंधित वाहनाचा पाठलाग करून चतुराईने आरोपीला वर्धा जिल्ह्यातील टोल नाक्याजवळ पकडले.या प्रकरणातील आरोपी समता नगर वार्ड क्रमांक 6 निवासी अतुल मालाजी अलीवार 22, दिपक नरेंद्र खोब्रागडे 18, नेरी निवासी सिध्दार्थ आदेश बन्सोड 21, सम्राट अशोक वार्ड निवासी संदेश सुरेश चोखांद्रे 19, समता नगर वार्ड क्रमांक 6 निवासी सुरज दिलीप शहारे, नेरी निवासी साहेबराव उत्तम मलिये 45, उर्जानगर कोंडी निवासी अजय नानाजी दुपारे 24, उर्जानगर निवासी प्रमोद रामलाल सुर्यवंशी यांना अटक केली आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post