चंद्रपूर :- शहरालगत असलेल्या महाऔष्णिक वीज केंद्राच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळील नायरा पेट्रोल पंपाजवळ एका 32 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने निघृण हत्या केली. आरोपींनी चक्क धडापासून मुंडके वेगळे केल्याने या घटनेमुळे शहर हादरले आहे. ही चित्त थरारक घटना सोमवारी 7 नोव्हेंबर रोजी रात्री 10.35 वाजताच्या सुमारास घडली. महेश मेश्राम 32 रा. अय्यपा मंदिर परिसर, चंद्रपूर असे मृतक युवकाचे नाव आहे. याप्रकरणात दुर्गापूर पोलिसांनी भागीरथी ठाकूर 32 व शुभम मलीये 20 या दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दुर्गापरची हद्द सुरू होते. याच परिसरात महाऔष्णिक वीज केंद्राच्या बाजुला नायरा पेट्रोल पंप असून लगतच एक बियर आहे. मृतक व अज्ञात मारेक-यांमध्ये याच बारमध्ये भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने मारेकरी त्या युवकाला लगतच्या पेट्रोल पंप परिसरात घेऊन गेले. त्या ठिकाणी त्याला दगडाने ठेचले. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याची धारदार शस्त्राने हत्या केली व मुंडके धडापासून वेगळे केले. हत्येची घटना माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना फोन केला. याच दरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
मुंडके धडापासून वेगळे केल्यावर एवढ्यावरच आरोपी थांबले नाही, तर त्यांनी मुंडक्यासोबर फुटबॉलप्रमाणे खेळ खेळला. मृतदेहाचा किळसवाणा प्रकार केल्याचे काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. मात्र, जुन्या वादातूनच हा प्रकार घडला असल्याचीही चर्चा या परिसरात आज दिवसभर चर्चील्या गेली. त्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले. परंतु, या घटनेनंतर आज या परिसरात दहशत पसरली होती.चंद्रपूर लगत हाकेच्या अंतरावर दुर्गापूर गाव आहे. येथे स्वतंत्र पोलिस ठाणे आहे. परंतु या परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. हा परिसर अतिसंवेदनशील मानल्या जातो. घटनेनंतर रात्री 12.20 वाजताच्या सुमारास पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. ठाणेदार धुळे या प्रकरणाचा तपास करीत असून या घटनेत आणखी काही आरोपींना अटक होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. कारण की, हे एकट्या व्यक्तीचे काम नसून सामूहिकपणे ही हत्या करण्यात आल्याने यामागील नेमके कारण पोलिस तपासाअंती स्पट होईल. पुढील तपास दुर्गापूर पोलिस करीत आहे.या घटनेनंतर घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून गर्दीवर नियंत्रण मिळविले. हत्या प्रकरणात सहा ते सात आरोपींचा समावेश असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांच्या आधारे समोर येत आहे. मृतकाने काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला मारहाण केली होती. त्याच वैमनस्यातून त्या युवकाची हत्या केल्याचे बोलल्या जात आहे.
