महर्षी सुदर्शन महाराज जन्‍मोत्‍सवानिमीत्‍त निघालेल्‍या शोभायात्रेचे भाजपातर्फे भव्‍य स्‍वागत




सुदर्शन महाराजांच्‍या शिकवणीचा अंगीकार हीच त्‍यांना खरी आदरांजली – राहूल पावडे

 


चंद्रपूर:- श्री महर्षी सुदर्शन महाराज यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमीत्‍त सुदर्शन समाजातर्फे चंद्रपूरात काढण्‍यात आलेल्‍या शोभायात्रेचे भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर शाखेतर्फे स्‍थानिक कस्‍तुरबा चौकात भव्‍य स्‍वागत करण्‍यात आले.श्री महर्षी सुदर्शन महाराज यांचा जयजयकार करणा-या घोषणांनी यावेळी परिसर निनादुन गेला होता. माजी उपमहापौर राहूल पावडे, महानगर कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, सुर्या खजांची, रेणुका घोडेस्‍वार,शिला चव्‍हाण, अरूण तिखे, सचिन कोतपल्‍लीवार, सोपान वायकर, चंदन पाल, सिंधु राजगुरे, मनिषा महातव, रंजीता येले, कृष्‍णा चंदावार, सुशांत आक्‍केवार, बाळू कोलनकर, चॉंद सय्यद, प्रमोद क्षिरसागर, अमोल मत्‍ते, गणेश रामगुंडावार, सुशांत शर्मा, अक्षय शेंडे, निलेश हिवराळे, धम्‍म भस्‍मे, प्रणय सरकार, राजेश थुल, आदी भाजपा पदाधिका-यांसह मोठया संख्‍येने भाजपा कार्यकर्ते या स्‍वागताप्रसंगी उपस्थित होते. श्री महर्षी सुदर्शन महाराज यांचे जीवन भक्‍ती मार्गाला समर्पित होते. ज्ञान, निती व अध्‍यात्‍मक यांच्‍या माध्‍यमातुन त्‍यांनी सत्‍यशोधक बाणा कायम जपला. असहाय्य जनतेची मदत करत साधुसेवा करण्‍यावर भर देत त्‍यांनी जी शिकवण आपल्‍याला दिली आहे, त्‍याचा अंगीकार हीच त्‍यांना खरी आदरांजली ठरेल, असे उद्गार माजी उपमहापौर राहूल पावडे यांनी काढले.
शहरात निघालेल्‍या या भव्‍य शोभायात्रेचे स्‍वागत करत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भक्‍तीमय वातावरणात जल्‍लोष साजरा केला.
Post a Comment (0)
Previous Post Next Post