वरुर येथील सोशल युथ क्लब वर अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची धाड*



राजुरा ( संजय कोंडावार) वरुर रोड येथील  सोशल युथ क्लब येथे जिल्हा अप्पर पोलीस  अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आपल्या कर्मचार्‍यांसह धाड टाकून 85 जुगार खेळणाऱ्यावर व युथ सोशल क्लब अध्यक्षावर व इतर दोन जनावर गुन्हा दाखल केला.चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील  राज्य महामार्गा लगत  येत असलेल्या विरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील वरुर रोड येथे सोशल युथ क्लब हा मागील दहा ते बारा दिवसापासून चालू होता. शासकीय  नियमानुसार रात्री दहा वाजेपर्यंत अवधीचा टाईम होता. येथील क्लब चालक यांनी वेळेचा अपव्यय घेऊन व नियमाबाह्य एक ते दोन तास नेहमी चालवीत असल्याची माहिती जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळताच या गंभीर घटनेची दखल घेऊन   आपल्या कर्मचार्‍यांसह काल रात्री 11:30 वाजताच्या सुमारास सापळा रचून कारवाही केली. कारवाईच्या दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक व पोलीस कर्मचारी तेथे गेले असता  तेथील उपस्थित  85 ते 90 जुगारी व पोलीस यांच्यामध्ये  धक्काबुक्की झाली. त्यामध्ये दोन पोलिस कर्मचारी टिनचे लोखंडी शेडला लागल्यामुळे त्यांना डोक्याला दुखापत झाली. वादाचे तीव्र रूप दिसल्यामुळे जिल्हा अपर पोलीस अधीक्षक यांनी सी 60 कमांडो, व दंगा पथक  यांना पाचारण केले. काही वेळांनी दंगा पथक, व सी 60 कमांडो यांच्या सहाय्याने 85
 जुगारी, व युथ सोशल क्लब अध्यक्ष  व्यंकटेश मल्लया तोटा, रा. तेलंगणा  राज्यातील मंचिर्याल यांना विरुर पोलीस स्टेशन येथे दाखल करून गुन्हा दाखल केला. व दोन आरोपी  शेर श्रीकांत, श्रीनिवास गंगारेडी हे फरार आहेत.घटनेच्या पूर्वी रात्री 10 दहा वाजताच्या सुमारास विरूर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण मी व माझे कर्मचारी गस्त करीत असताना युथ सोशल क्लब मध्ये जाऊन बंद करण्याच्या सूचना दिल्या. व मी माझे कर्मचारी  पुढील गस्त करण्यासाठी लक्कडकोट येथे निघालो.
यातील मिळालेला मुद्देमाल 10 लाख 71 हजार 692 रोख रक्कम, मराझो कार अंदाजे किंमत 6 लाख रुपये, क्लासिकल पत्ते 555, मार्क केक नोट सोलुशन मशीन किंमत 7 हजार रुपये, डेल कंपनी चे मॉनिटर 5 हजार रुपये, सी.पी प्लस डीव्हीआर किंमत 5 हजार रुपये असा एकूण 16 लाख 88 हजार 692 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.85 जुगाऱ्यावर  4,5 महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून यातील आरोपी युथ सोशल क्लब अध्यक्ष वेंकटेश मल्लय्या तोटा वय 36, रा. तेलंगणा राज्यातील मंचिर्याल यांचेवर कलम 353,332 शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, व शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणे या नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.तर यातील दोन आरोपी शेर श्रीकांत, श्रीनिवास गंगारेड्डी हे फरार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांनी सांगितले की रात्री दहाच्या सुमारास मी व माझे कर्मचारी गस्त करीत असताना युथ सोशल क्लब मध्ये जाऊन बंद करण्याच्या सूचना दिल्या माझ्या कर्मचार्‍यांसह लक्कडकोट कडे गस्ती साठी निघालो.
Post a Comment (0)
Previous Post Next Post