गुरगुरण्याच्या आवाजाने ते दाम्पत्याला आली जाग समोर बघितले तर बसला होता वाघ



चंद्रपूर :- सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागातील लोक अंगणात खाटा टाकून झोपतात. मात्र, बाहेर झोपणे अनेकदा ग्रामस्थांच्या जीवावर बेतल्याचे दिसून आले आहे. सध्या सिंदेवाही तालुक्यातील गडमौशी परिसरात वाघाचा संचार सुरू आहे. अशातच गडमौशी येथील पती- पत्नी हे उन्हाळ्याच्या गरमीमुळे अंगणात झोपले होते. सोमवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघ तिथे आला. त्याच्या गुरगुरण्याने हे दाम्पत्य जागे झाले. पाहिले तर चक्क समोर वाघ बसला होता. वाघाला समोर बघताच सदर दाम्पत्याची चांगलीच भंबेरी उडाली.
वाघाच्या भितीने जीव वाचविण्यासाठी दोघांनीही आरडा ओरड केली. यामुळे गावातील नागरिक जमा झाले आणि त्यांनी वाघाला पळवून लावले. त्यानंतर या पती-पत्नीचा जीव भांड्यात पडला. सध्या गावकरी घराच्या अंगणात झोपत आहेत. जंगल परिसर लागून असल्याने पहाटेच्या सुमारास पट्टेदार वाघाने गावाकडे धुम ठोकली. पती-पत्नी झोपून असताना शेजारच्या गोठ्यात शेळ्या बांधून होत्या. आवाज ऐकून दोघेही उठून बसताच अंगणात पट्टेदार वाघ समोर उभा ठाकल्याने मात्र, आरडा ओरड करत लोकांना गोळा केल्याने मोठा अनर्थ टळला असेच म्हणावे लागेल. परंतु, आता या परिसरात अंगणात झोपणे महागात पडू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Post a Comment (0)
Previous Post Next Post