चंद्रपूर:- विश्वाला मानवतेचा महान संदेश देणारे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी तरग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या उत्थानासाठी व शेतकऱ्यांसाठी ग्रामगीतेतून ग्रामनाथाची व्यथा मांडली ग्राम परिवर्तन होण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यांचा अभ्यास करून ग्रामगीता शेतकऱ्यांसाठी अर्पण केली अशा या क्रांतिकारी महान संतांची आज ग्राम जयंती म्हणून सर्वत्र साजरी करण्यात येत आहे.
असे प्रतिपादन माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी राष्ट्रवादी नगर येथे आयोजित वंदनीय राष्ट्रसंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केले. राष्ट्रसंताचे विचार सर्वांनी अंगीकारावे व त्या विचाराने कृती करावी. याप्रसंगी राष्ट्रसंताच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादी नगर येथे ओपन स्पेस ला राष्ट्रसंताचे नाव देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक राजेंद्रजी गुंडावार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी धर्मेंद्र पंडित व गुंडावर ताई तसेच उदार ताई विलास शंकर दरेकर व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. यशस्वी करण्यासाठी गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रवादी नगर येथील प्रभाकर आवारी नथुजी ठाकरे रामदास येशे कर सूर्यभान तुमसरे किसन कुडे वसंत दाडमल सुमित्रा आवारी शरद लहू तेरे आदीं परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर आवारी यांनी केले तर आभार प्रदर्शन सुमित्रा आवारी यांनी केले

