विद्यार्थ्यांनी भरून दिलेले पोस्टकार्ड सुद्धा जिल्हाधिकार्यांना देणार
चंद्रपूर :- जगन्नाथ बाबा नगरात सध्या दारू विक्रेत्यांनी या परिसरात आपला मोर्चा वळवला ने येथील सामाजिक वातावरण गढूळ होत आहे नागरिकांच्या अनेक तक्रारी माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या कानावर पडल्यानंतर दारू विक्रेते विरुद्ध लोकशक्ती असा संघर्ष आता बघायला मिळतो याच पार्श्वभूमीवर लोकांकडून लोकसहभागातून जनमत चाचणीचे अर्ज भरून घेण्यात आली होती यात नागरिकांच्या तक्रारी त्यांची दारू बंदी बाबत काय म्हणणे आहे या सर्व इतर बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला याशिवाय शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी यांचीही मते जाणून त्यांच्याकडून पोस्टकार्ड माध्यमातून मते जाणून घेण्यात आली यानंतर जनमत चाचणी चे अर्ज आणि विद्यार्थ्यांनी लिहिलेली पोस्टकार्ड जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचणार आहेत चंद्रपूरचे माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या उपस्थितीत जगन्नाथ बाबा नगर दारूबंदी संघर्ष समितीने जोपर्यंत देशी दारू भट्टी स्थलांतरित होणार नाही तोपर्यंत समिती शांत बसणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे समितीच्या वतीने जनमत चाचणी चे फॉर्म व पोस्टकार्ड जिल्हाधिकाऱ्यांच्या सुपूर्द करण्यात येणारा आहे जगन्नाथ बाबा नगर परिसरातील दारुबंदी हा विषय आता शहरात पुरता मर्यादित न राहता जिल्ह्यातही चर्चिला जात आहे दारू शक्ती विरुद्ध लोकशक्ती असा सामना या भागात जनसमूह आतून उभा झाला आहे त्यामुळे वारंवार प्रशासनाकडे भेटी निवेदने आंदोलने या विविध लोकशाही आयुधांच्या माध्यमातून संघर्ष सुरू असताना संघर्ष समितीने नियमानुसार टाकलेल्या पावलांवर जिल्हा प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभाग यावर काय कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे
