अखेर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री धावले पूर्वा च्या मदतीला



सावली :- येथील जेनेटिक च्या  आजाराने त्रस्त असलेल्या कु. पूर्वा विलास निकेसर, वय ६ वर्षे यांना मान. नाम. विजयभाऊ वडेट्टीवार साहेब इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनवर्सन तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांनी आर्थिक मदत करून एक आधार दिला आहे.यावेळी उपस्थित सौ. लताताई लाकडे नगराध्यक्षा नगर पंचायत सावली, विजयजी मुत्यालवार शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी तथा नगरसेवक नगर पंचायत, प्रफुलजी वाळके नगरसेवक नगर पंचायत, श्री नितेशजी रस्से बांधकाम सभापती तथा नगरसेवक नगर पंचायत, सौ साधनाताई वाढई नगरसेविका नगर पंचायत,गुणवंतजी सुरमवार नगरसेवक नगर पंचायत, देवरावजी मोहूर्ले जेष्ठ कार्यकर्ते व संपूर्ण काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
 विजयभाऊ हे चंद्रपूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री असून त्यांनी अनेकांना आधार दिलेला आहे. सावली  येथील कु पूर्वा विलास निकेसर यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून त्यांना जेनेटिक आजार जडलेला आहे. ही बातमी काँग्रेसचे नगरसेवक श्री सचिन पाटील संगीडवार यांनी सावली  काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष श्री विजयजी मुत्यालवार यांच्याशी चर्चा करून हा विषय विजयभाऊ च्या लक्ष्यात आणुन दिले. भाऊ ने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ मदतीचे आश्वासन देऊन काही दिवसांतच ही आर्थिक मदत संपूर्ण कांग्रेस चे पदाधिकारी जाऊन मदत पोहचवून दिले  विजयभाऊ हे गरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जातात. अश्यातच त्यांनी आर्थिक मदत देऊन त्यांना आधार दिले. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत गरीब जनतेची सेवा करण्याचे वचन दिले आहे.

Post a Comment (0)
Previous Post Next Post