पोलिस ठाण्याचे बॅरिकेट्स आगीच्या भक्ष्यस्थानी संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष



चंद्रपूर :- कोणताही सभा, आंदोलने, रॅली अथवा मिरवणूका असोत पोलिस बंदोबस्तामध्ये वाहतूक वळविण्यासाठी किवां बंद करण्यासाठी बॅरिकेट्ससचा वापर मोठ्याप्रमाणात करण्यात येतो. मात्र, सध्या हेच पोलिस ठाण्यातील बॅरिकेट्स सध्या शहरातील दानववाडी परिसरात आगीच्या ज्वाळात भस्मसात होत आहेत. मात्र, संबंधित विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
प्रामुख्याने गर्दी अडविण्यासाठी किंवा वाहतूक वळविण्यासाठी बॅरिकेट्साचा उपयोगी केला जातो. निवडणुकीदरम्यान तर 100 मीटर परिसरात नियमबाह्य जमाव अथवा गर्दी प्रतिबंधित करण्यासाठी शासनाच्या नियमानुसार हेच बॅरिकेट वापरले जाते व नागरिकांना बॅरिकेट बाहेर रोखण्यात येते. मात्र सध्या हेच बॅरिकेट दानववाडी परिसरात एका कचराकुंडीमध्ये मागील अनेक दिवसांपासून दुर्लक्षित पडून होते. अलिकडेच कचराकुंडीतील कचरा जाळताना बॅरिकेट्सूही आगीच्या ज्वाळात सापडले आहे. शहर पोलीस स्टेशनच्या दुर्लक्षितपणामुळे सदर प्रकार घडला असून चंद्रपूर सिटी पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या दानववाडी सेंट फ्रान्सिस शाळेजवळ हे बॅरिकेट एका कचराकुंडीमध्ये आगीच्या भस्मस्थानी पडले आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. संबंधित विभाग आता याप्रकरणी काय कार्यवाही करतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post