*उपमहापौर राहूल पावडे यांच्या नेतृत्वात स्टेशन मास्टरला भेटले शिष्टमंडळ
चंद्रपूर:- शहरातील दुधडेअरी परिसरातील सावरकर नगरातील शासकीय जागेत पक्की घरे बांधून राहणा-या नागरिकांना रेल्वे विभागातर्फे अतिक्रमण म्हणून नोटीस देण्यात आल्या आहेत व जागा खाली करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या अन्यायकारक कार्यवाहीबद्दल भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर शाखेतर्फे रेल्वे विभागाच्या स्टेशन मास्टर श्री. मुर्ती यांना आज निवेदन देण्यात आले.यावेळी स्टेशन मास्टर श्री. मुर्ती यांच्याशी चर्चा करताना उमहापौर राहूल पावडे म्हणाले, महानगरपालिकेतर्फे या परिसरातील नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यात आल्या आहेत. हे नागरिक महानगरपालिकेला मालमत्ता कराचा भरणा सुध्दा करीत आहे. या नागरिकांची घरे रेल्वे साईडींगपासून बरीच दूर आहेत. हे सर्व नागरिक कामगार व मोलमजूरी करणारे आहेत. त्यांची घरे हटविल्यास त्यांच्या निवासाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.
