ब्रम्हपुरी :- तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील निसर्गरम्य वातावरणात 15 एकर जागेत 15 कोटी रुपयांच्या निधीतून विपश्यना केंद्र उभारण्याच्या प्रस्तावास पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नाने शासनाची मंजुरी नुकतीच मिळाली आहे.
सदर विपश्यना केंद्राच्या जागेची पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी अड्याळ येथे भेट देऊन प्रत्यक्षरित्या पाहणी केली. व संबंधित अधिकाऱ्यांकडून विपश्यना केंद्र विकासाचा आराखडा पाहणी करून सूचना केल्या. विपश्यना केंद्राच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याबद्दल आनंदित गावकऱ्यांनी पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांचा सत्कार केला. त्यांनी नम्र स्वीकार करून पुढील विकासकामांसंदर्भात चर्चा केली.

