नवरात्री उत्सवानिमित्त भजन स्पर्धा
चंद्रपूर :- येथील जय दुर्गा मा शक्तीपीठ व सखी वाणी संस्थेच्या वतीने नवरात्री उत्सवात दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी जटपुरा वार्ड येथील दुर्गा मंदिरात भजन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये एकूण दहा भजन मंडळांनी सहभाग घेतला असता प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जगन्नाथ बाबा गुरुदेव महिला भजन मंडळ चंद्रपूर यांनी पटकाविला आहे. या भजन मंडळ स्पर्धेचे आयोजन संगीता त्रिवेदी, राकेश सिंगरू यांच्या वतीने करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुधीरजी नाकाडे संगीता विशारद प्रवीण नवले महाराज (हरिभक्त परायण) यांच्या उपस्थिती बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. या भजन स्पर्धेमध्ये सर्व मंडळींनी उत्तमरीत्या भजन सादर करून समाज प्रबोधनाचा संदेश दिला. या कार्यक्रमाचे संचालन मीना कानेरकर यांनी केले. व श्रोतागणांचे आभार सुद्धा मानले या प्रसंगी जगन्नाथ बाबा गुरुदेव महिला भजन मंडळ अध्यक्ष रत्ना यरणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.