चंद्रपूर:- ज्ञानार्चना दिव्यांग महिलाश्रम जवळ, माऊली रेसिडेन्सी परिसर आणि मातोश्री गार्डन परिसर जगन्नाथबाबा नगर, चंद्रपूर येथे नुकताच शितलामाता बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला."कराल वृक्षावर माया,तर मिळेल थंडगार छाया "ही भावना भावी पिढीच्या मनात वृद्धिंगत व्हावी हा उद्देश ठेवून शांती पार्क कॉलनी मध्ये विविध रोपटयांचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करण्या अगोदर परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच वृक्षारोपण करून त्याला ट्री गार्ड लावण्यात आले . लावलेल्या रोपट्यांचे संवर्धन व जतन करण्याचा निर्धार उपस्थित सर्व नागरिकांनी व्यक्त केला. कॉलनीमधील रोड लगतची मोकळी जागा येथे वृक्ष लावून परिसर हिरवेगार करण्याचा संकल्प करण्यात आला. एक कुटुंब,एक झाड हा उपक्रम राबवून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे विचार संस्थेचे सचिव श्री.शरद चिलबुले यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे सहसचिव श्री. अनिल बोपनवार,श्री. सुनील ढोके,श्री.उज्वल मासुरकर, श्री.रमेश पुल्लोरी, प्रवीण गवळी आणि शांती महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ.मृणालिनी चिलबुले,सचिव सौ.सीमा ढोके, सौ. सुवर्णा बोपनवार, पूजा सिंग, आरती मासुरकर, शीतल मासुरकर,भावना पुल्लोरी, स्नेहा गवळी, शिवानी बोपनवार यांची उपस्थिती होती.