निसर्ग अभ्यासक फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम

भामरागडातील नदीचा अभ्यास आणि संशोधन महोत्सव 
भामरागड :- निर्सग अभ्यासक फाउंडेशन चे अध्यक्ष व संस्थापक डाॅ. कैलास व्हि. निखाडे यांच्या  संकल्पनेतुन तसेच राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय  यांच्या संयुक्त विद्यमानाने नदीचा अभ्यास आणि संशोधन आणि संवर्धन महोत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ. संतोष डाखरे उपस्थित होते उद्घाटन प्रा. डाॅ. प्रमोद सं. घोनमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. निर्सग अभ्यासक फाउंडेशन चे अध्यक्ष संस्थापक डाॅ. कैलास व्हि. निखाडे  यांनी आपल्या प्रास्ताविके मधून सांगितले की नदी म्हणजे जमिनीवरून एका दिशेने वाहणारा पाण्याचा मोठा नैसर्गिक प्रवाह  हा गोड्या पाण्याचा प्रवाह गुरुत्वाकर्षणामुळे उतारावरून वाहत जातो आणि समुद्राकडे किंवा इतर जलाशयाकडे पोहोचतो नद्यांचा उगम पर्वतांवरून झऱ्यांमधून किंवा हिमनद्या वितळण्यामुळे होतो आणि त्या पिण्याचे पाणी सिंचन व वाहतूक यांसारख्या अनेक मानवी गरजा पूर्ण करतात भामरागडमध्ये पर्लकोटा पामुलगौतम आणि इंद्रावती या तीन नदीचा संगम आहे. या नदीच्या पाण्याचा योग्य उपयोग केला तर आपल्याला रोजगार मिळतो. असे त्यांनी सांगितले. आज नदीला प्रदुषन पासून वाचवणे गरजेचे आहे. तसेच  उद्घाटन प्रा. डा. प्रमोद  सं. घोनमोडे यांनी  नदीच्या पाण्याला हातात घेउन कार्यक्रमाचे  उद्घाटन केले.व त्यांनी आपल्या भाषनातुन सांगितले की नद्यांचा प्रमुख उपयोग पाण्याचा स्रोत म्हणून होतो वाहतुकीसाठीही नदीचा उपयोग होतो नदीचा उपयोग संरक्षणाची ढाल वीजनिर्मितीए आणि मोठी यंत्रे चालवण्यासाठीही करून घेतला जातो औद्योगिकीकरण आणि शहरांची घाण वाहून नेण्यासाठी नद्यांचा वापर सध्या होत आहे. भूभागांची सरहद्द सुनिश्चित करणे वाहतुकीचे माध्यम व दिशादर्शक म्हणून नदीचा उपयोग शतकानुशतके होत आला आहे. नदीतल्या नौकानयनाचा पहिला पुरावा इण्सण् पूर्व ३३०० पासून सिंधू संस्कृतीमध्ये सापडतो नदीपात्रातली वाहतूक ही अतिशय स्वस्त पडते आज ही जगातल्या महत्त्वाच्या आणि मोठ्या नद्यांमध्ये अशी वाहतूक केली जाते उदा. अ‍ॅमेझॉन नदी गंगा नदीए नाईल नदीए मिसिसिपी नदी आणि सिंधू नदीण् स्कँडिनेव्हियाए कॅनडा ब्रह्मदेश या देशांतील दाट अरण्यांच्या प्रदेशांत तोडलेले वृक्ष वाहून इच्छित ठिकाणी नेण्यासाठीही नद्यांचा उपयोग केला जातोण्  डाॅ. संतोष डाखरे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून सांगितले की अनादी काळापासून अन्न मिळवण्यासाठी नद्यांचा उपयोग होत आला आहे. नद्यांतील जीवसॄष्टीचे एक चक्र असते यामुळे अनेक प्रकारचे मासे मिळतातण् फक्त मासेमारीच नव्हे तर शेतीसाठी व पर्यायाने अन्न उत्पादनासाठी नदीच्या पाण्याचा उपयोग होत आला आहे. गोड्या पाण्याचा उपलब्धीमुळे जगातील बहुतेक सर्व शहरे नदीकाठीच वसलेली आहेत. नद्यामुळे शहर कसे बनणार याचा आराखडाही आपोआप ठरत जातो असे दिसून येते. या शहरांच्या उभारणीमुळे सांडपाणी नदीत सोडले जाते आणि नदीचे प्रदूषण होतेण् भारतातील बहुतेक नद्यांच्या काठावर मनोरंजनासाठी व नदीत प्रवेश करण्यासाठी उपयुक्त असे काठ ;घाटद्ध बनवले गेले आहेत. नदीतील वाळूचा उपयोग बांधकामासाठी केला जातो सुशोभित केलेले नदीचे काठ जास्त पर्यटक आकर्षित करतातए आणि स्थानिक समाजातील लोकांना जलपर्यटनाची सोय करण्याची संधी देतात कार्यक्रमाचे  संचालन  किरण कुरसामी यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.वच्छेला मडावी यांनी केले कार्यक्रम यशस्वी साठी विद्यार्थी व विद्यार्थीनी परिश्रम घेतले व बंडु बोन्डे यांनी प्रयत्न केले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post