पठाणपुरा गेट बाहेरील इराई नदी पुलावर मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्या

तसेच पठाणपुरा वार्ड प्रभागात स्वच्छतेकडे लक्ष देण्यात यावे

 भारतीय जनता पार्टी ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्याम बोबडे यांची मागणी

आता येणार मागणी पूर्णतःवास
चंद्रपूर :- पठाणपूरा ते आरवट (बल्लारशा विधानसभा क्षेत्र) रोड वर इरई नदीचा पुलआहे. या पुलावर रात्री अंधार असतो. याठिकाणी शमशान भूमी सुद्धा आहे. येथे प्रेतावर अंत्यसंस्कार करताना रात्री लोकाना नाहक त्रास होतो. रात्री लोक शतपावली साठी जातात. याठिकाणी जंगली वन्य श्वापदांचा वावर असतो.पुलीया वर रात्री काही लोक तसेच असामाजिक तत्वाचे तरुण नशा करत असतात.  नशेमध्ये बेधुंद असतात. सकाळी किंवा सायकाळी वाक साठी येणाऱ्या महिला आणि गावकऱ्यांना याचा मोठा त्रास होतो आहे. रोड च्या बाजूची काही झुडुप झाडे सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढुंन आहे. त्यामुळे पुलावरील तसेच या परिसरात मूलभूत सोयेसुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी श्याम बोबडे यांनी लोकनेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे केली. आता ही मागणी लवकरच पूर्णतःवास येणार आहे. त्यामुळे स्थनिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.या शिवाय पुलाच्या सुरुवातीस व अखेरीस २ नवीन पोल व ७५-९० वॉट चे लाइट लावून देण्यात यावे, तसेच पठाणपुरा गेट प्रभाग या वार्डात सामान्य नागरिकांना त्यांच्या मूलभूत सुविधा यात स्ट्रीट लाईट स्वच्छता घंटागाडी आणि परिसर स्वच्छ राहिला पाहिजे या दृष्टीने सेवा पुरवण्यात यावी या सर्व जिव्हाळ्याच्या मागण्यांना घेऊन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्याम बोबडे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्या अनुषंगाने ही समस्या लवकरात लवकर तडीस जावी ही त्यांची आग्रही मागणी आहे. तसेच ही मागणी लावजरच पूर्ण होणार आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post