देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात काशिनाथ घटेंचे अमूल्य योगदान :अॅड. विजय मोगरे

स्वातंत्र्य सैनिक काशिनाथ घटेंच्या नावाने चौकाचे उद्घाटन
चंद्रपूर : चिमूर क्रांती लढ्याने या परिसरातच नव्हे, तर तमाम देशासाठी स्वातंत्र्यांचे स्फुल्लिंग चेतविले आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये चिमूर हा क्रांती लढा एक सोनेरी पान म्हणून कायम स्मरणात आहे. चिमूरच्या लढ्याने भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याची ‘करो या मरो’ ही भूमिका आणि दिशा राष्ट्रीय स्तरावर निश्चित केली आहे. या लढ्यात स्वातंत्र्य सैनिक काशिनाथ घटे यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी स्वातंत्र्यासाठी नऊ महिन्यांचा तुरुंगवास भोगला, असे प्रतिपादन फिमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. विजय मोगरे यांनी केले.शहरातील बिनबा वॉर्डात स्वातंत्र्य दिनी (ता. १५) स्व. काशिनाथ घटे यांच्या नावाने बिनबा रोड लगत चौक फलक उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अॅड. विजय मोगरे बोलत होते. सोहळ्याला ग्रामगीताचार्य बंडोपंत बोडेकर , डॉ.बाबासहेब आंबेडकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बेले, प्राचार्य वरभे सर,सेंट फ्रान्सिस शाळेचे प्राचार्य, कुमार मॅडम,कुमार सर,आयटीआयचे प्राचार्य अभय घटे, सरस्वती महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सुनील घाटे, रेणुताई घोडेस्वार,समाज भूषन राजु येले,तेली समाजाचे बिनबा वॉर्ड अध्यक्ष  राजू घटे, प्रविन कुलटे,सुनिल मार्कंडवार बंडू वासेकर,सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजेश व्ही घटे, दिपक घटे, राजेश गजानन घटे,विकास घटे,मनोज घटे, प्रवीण घटे, पराग घटे, शेखर घटे,संजय घटे,शुभम घटे, भारत घटे, मकरंद घटे, अक्षित घटे, अंकित घटे,,सौ. गंगा घटे, सौ.ज्योती घटे, सौ.रोहिणी घटे, सौ.वैशाली घटे, सौ.दुर्गा घटे, ममता घटे, पायल घटे, लोकेश घटे,राहुल घटे, कृष्णा घटे, यांनी मोलाचे सहकार्य केले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post