राज्यस्तरीय योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत निवड

प्रज्वल , प्रथमेश ,  सिद्धांत ,तेजस यांचे 'सुवर्णासन' राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी चंद्रपुर संघ सज्ज
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन योगासन भारताशी संलग्न  यांच्या सहकार्याने चंद्रपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2025 -2026- ही स्पर्धा दिनांक २७ जुलै २०२५ ला ही स्पर्धा वसंत वैभव हॉल चिंतामणी विज्ञान महाविद्यालय पोंभुर्णा येथे पार पडली.या स्पर्धेत सीनियर मुले गटात प्रज्वल प्रदिप निखार  1) ट्रँडिशनल योगासन सुवर्णपदक, तर साहिल बाळकृष्ण गोटेफोडे 1) सुपाइन श्रेणी आसन सुवर्णपदक, २) लेग बॅलन्स वैयक्तिक श्रेणीत सुवर्णपदक पटकवले. प्रथमेश अशोक दुर्सेलवार याने 1) ट्विस्टिंग वैयक्तिक सुवर्णपदक, २) फॉरवर्ड बेंड वैयक्तिक श्रेणीत सुवर्णपदक.सब-ज्युनियर मुले गटात सिद्धांत संजय धुरत याने 1) ट्रँडिशनल योगासन कांस्य पदक, 2) ट्विस्टिंग वैयक्तिक श्रेणीत सुवर्णपदक मिळविले.तेजस प्रविण राजूरकर ने 1) फॉरवर्ड बेंड वैयक्तिक 4 स्थान, 2) सुपाइन श्रेणी आसन रौप्य पदक प्राप्त केले.सीनियर मुलीनमध्ये अवंतिका अशोक तिवारी हिने 1) फॉरवर्ड बेंड वैयक्तिक रौप्य पदक, 2) सुपिन श्रेणी आसन श्रेणीत सुवर्णपदक पटकवले.या सर्व खेळाडूंनी एकूण सुवर्ण = ७, रौप्य = २,कांस्य = १ असे एकूण 10 पदकांची कमाई केली.महाराष्ट्र राज्य सहाव्या योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्येमहाराष्ट्रातील 36 जिल्हे सहभागी होणार असून६ वी सिनीयर राज्यस्तरीय योगासन स्पर्धा ही आनंदवन, वरोरा, चंद्रपुर दि. २२/८/२०२५ ते २४/८/२०२५, ६ वी सब ज्यूनियर व ज्यूनियर राज्यस्तरीय योगासन स्पर्धा हि ध्रुव ग्लोबल स्कूल, संगमनेर, अहिल्यानगरदि. १५/८/२०२५ ते १८/८/२०२५ दरम्यानतर ६ वी सिनीयर राज्यस्तरीय योगासन स्पर्धा ही छत्रपती संभाजी नगर येथे दि. २९/८/२०२५ ते ३१/८/२०२५ या कालावधीत होणार आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post