भाजपाने केले जातिनिहाय जनगणना निर्णयाचे स्वागत
चंद्रपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आता जातिनिहाय जनगणना करणार आहे. याबाबत कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात आला.या निर्णयामुळे लोकशाही मजबूत होईल.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिल्यांदाच जातीनिहाय जनगणना होणार आहे.या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो,असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष(श)राहुल।पावडे यांनी केले. चंद्रपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवारी (दि.2) सायंकाळी गांधी चौक येथे निर्णयाचे स्वागत करून जल्लोष करतांना ते बोलत होते.माजी पालकमंत्री व बल्लारपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वा हे आयोजन करण्यात आले. यावेळी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.मोदी हैं तो मुमकींन हैं अशी घोषणाबाजी करण्यात आली. कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्षराहुल पावडे, ओबीसी नेते अशोक जीवतोडे, सुरज पेदुलवार,भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष सविता कांबळे,शीला चव्हाण, नम्रता टेमसकर,पुरुषोत्तम सहारे, रवी लोणकर, दिनकर सोमलकर, सचिन कोतपल्लीवार,शिला चव्हाण, चाद सय्यद, रवी सहारे, मनीषा महातव, शाम कनकम, सारिका संदुरकर, मधुकर राऊत, प्रवीण गुरमवार, महेश जीटे, बी बी सिंग,बाळू कोलनकर, कैलास संगेवार, मुन्ना अलटम,दीपक प्रलय सरकार, महेंद्र जुमडे, आकाश मस्के, आकाश ठोसे, कविता जाधव, राजेंद्र खांडेकर, प्रदीप किरमे, गणेश गेडाम, अनिल सुरपाम, प्रमोद शास्त्रकार, पराग मलोडे, उपस्थित होते.