भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांचे प्रतिपादन
महानगर भाजपा तर्फे घुगरीचा महाप्रसाद
चंद्रपूर :- गुढीपाडवा हा केवळ नववर्षाचा प्रारंभ नसून, नवीन संकल्प, नवीन उमेद आणि नव्या ऊर्जेचे प्रतीक आहे.याच दिवशी प्रभू राम 14 वर्षांचा वनवास भोगून स्वगृही परतले.हा विजयोत्सव साजरा करण्याचाही दिवस आहे.या दिवशी नवं संकल्प केला पाहिजे.या पावन पर्वावर विकसित भारताचा संकल्प करू या,असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी केले.ते गुढीपाडवा निमित्य महानगर भाजपा तर्फे छोटा बाजार येथे रविवारी आयोजित गुढीपाडवा उत्सवात बोलत होते.लोकनेते आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सौजन्याने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात रामपाल सिंग, सविता कांबळे, पुरुषोत्तम सहारे, दिनकर सोमलकर, सचिन कोतपल्लीवार, संदीप आगलावे, रवी लोणकर, रवी गुरुनुले, अजय सरकार, चांद सय्यद, चंदन पाल, महेंद्र जुमडे,राजेंद्र खांडेकर, प्रलय सरकार, बी.बी सिंग शितल गुरुनुले, कल्पना बागुलकर, माया उईके, शिला चौव्हाण, वंदना संतोषवार जयश्री जुमडे, सुषमा नागोसे, आकाश मस्के, आकाश ठुसे,महेश झीटे, रेखा चन्ने,यांची उपस्थिती होती.प्रारंभी पावडे यांचे हस्ते गुढी उभारण्यात येऊन पूजन करण्यात आले.विविध कडधान्य वापरून तयार करण्यात आलेल्या घुगरीचे (उसळ)महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.यावेळी अनेकांनी एकमेकांना शुभेच्छा देत चैतन्याचा उत्सव साजरा केला.