दाताळा ग्रामपंचायतिच्या तक्रारकर्त्याला खुश करण्याचा प्रयत्न : घराजवळ नाली बांधकामाला सुरुवात

चंद्रपूर :- येथील काही अंतरावर असलेल्या दाताळा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भोंगळ कारभार सुरू असल्याची तक्रार भारत रोहने यांनी नुकतीच जिल्हा परिषदेचे सीईओ जॉन्सन व चंद्रपुरातील आमदार, खासदार यांना सदर निवेदन देऊन तक्रारींचा त्यांच्यासमोर जणू पाढाच वाचून दाखविला. सदर तक्रार भारत रोहणे यांनी केल्यानंतर मात्र ही तक्रार ग्रामसेवकांच्या अंगलट येताच  सदर ग्रामसेवकांनी आपल्या हालचालींना वेग दिल्याचे  दिसून येत आहे. प्रथम त्यांनी सर्वच नेत्यांच्या निकटवर्ती यांना फोन लावण्याचा प्रयत्न सुद्धा केला व हे प्रकरण कशाप्रकारे दडपता येणार अशा पद्धतीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहे. मात्र काही पत्रकारांनी या संदर्भात त्यांना याबद्दल विचारणा करण्याच्या प्रयत्न केला असता सदर ग्रामसेवकाचा मोबाईल हा संबंधित त्यांचा ठेकेदार उचलून याबद्दल ग्रामसेवक उत्तर न देता ठेकेदारांकडून सरवासारव मोबाईलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी आणखी एक कारणामा केला आहे तो असा की, काही दिवसापासून तक्रारकर्ता ते रोहणे यांच्या घरापाशी अर्धवट असलेली नाली आहे. त्यांनी याबद्दल कित्येकदा  अर्धवट नाली चे काम पूर्ण करून देण्याची विचारणा केली. मात्र त्यांना उडवा उडवी चे उत्तर दिले गेले. परंतु सदर भोंगळ कारभार समोर येत असल्याची माहिती मिळताच सदर ग्रामपंचायतचे ग्रामसेवकांनी त्यांच्या घरासमोरील नालीचे बांधकाम लवकरात लवकर करून देण्याचे ही यावेळी दिसून आले आहे. अशा प्रकारे ग्रामसेवकांद्वारे तक्रारकर्त्याला खुश करण्याचा कुठेतरी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांनी याबद्दल कितीही अशा प्रकारचे कामे त्यांच्या माध्यमातून केले जाणार तरी आता होणारी ही तक्रार कदापि हे त्यांना माफ करणार नाही, असे बोलल्या जात आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post