ठक्कर कॉलनी योग वर्गाचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

अध्ययावत योग भवन  निर्मिती करिता प्रयत्न करणार : राहुलभाऊ पावडे.
चंद्रपूर:- ठक्कर कॉलनी योग वर्गाचा प्रथम वर्धापन दिन बहुसंख्य महिला आणि पुरुष्यांच्या उपस्तितीत साजरा करण्यात आला. दिवसेंदिवस वाढते आजार आणि प्रदूषण बघता सर्वांनी योग, प्राणायाम करणे आवश्यक आहे व त्याकरिता अध्यायवत योग भवन निर्मिती करिता प्रयत्न नक्की करणार असल्याचे मत मा. श्री. राहुलभाऊ पावडे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांनी व्यक्त केले. या प्रसंगी श्री. मधुकर राजूरकर जिल्हा महामंत्री पतंजली योग समिती यांचा त्यांच्या योग कार्य बद्दल असलेली निष्ठा, धडपड आणि प्रगतीची दखल घेत शाल श्रीफळ व बुके देऊन सन्मान करण्यात आला. हा त्यांच्या कार्याचा गौरव असून पतंजली परिवार करिता अभिमानाची बाब असल्याचे मत श्री. सुधाकर श्रीपूरवार जिल्हा प्रभारी भारत स्वाभिमान न्यास यांनी व्यक्त केले. मा. श्री. विजय चंदावर माजी जिल्हा प्रभारी भारत स्वाभिमान न्यास, मा. श्री. अरविंद सोनी जिल्हा सह संघटन मंत्री भारत स्वाभिमान न्यास तसेच मा. श्री. शरद व्यास जिल्हा संघटन मंत्री पतंजली योग समिती यांनी सुंदर योग वर्ग घेऊन जीवनात योग प्राणायाम चे महत्व पटवून दिले. मा. श्री. अशोक सांगिडवार, प्रकाश कसर्लावर, हरिदास कापटे, सुधाकर शिरभैय्या व शिरभैय्या म्याडम तसेच दीपक मोहुर्ले यांनी योग जीवनावर प्रकाश टाकला. या प्रसंगी श्री. मधुकर राजूरकर यांनी सुरु केलेल्या ठक्कर कॉलनी योग वर्ग, रामाळा योग वर्ग, विश्वकर्मा योग वर्ग, पवनसूत योग वर्ग, मातोश्री योग वर्ग या पाचही योग वर्गातील योग शिक्षिका मनीषा वासलवार, रश्मी दासरवार, जयश्री पोळशेट्टीवर, अनिता खामणकर, अनिता मेश्राम, सुनीता गावंडे, प्रीती एकरे, रेशमा बुगगेवार, माधवी चार्लीकर, संगीता लांजेवार, उषाताई मडावी, यांचा पुष्प आणि लॉकेट देऊन श्री. सुधाकर श्रीपूरवार यांनी सत्कार केला. सौं. अनिता मेश्राम यांनी सुंदर संचालन केले. आरती काळे यांनी अहवाल वाचन करीत या योगरूपी रोपट्याचे वटवृक्षात कसे रूपांतर झाले याचा संपूर्ण इतिहास कथन केला. श्री. दीपक मोहुर्ले व त्यांच्या सुविधण्या पत्नी मंगलाताई मोहुर्ले यांनी अथक परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी पवनसूत योग वर्गाच्या मायाताई बेले, वंदना गिऱ्हे, रुदाली बुरडकर, मनीषा कारेकर, अनिता झाडें रजनी काळे, अंजना चौधरी, कुंदा असूटकर, काकले ताई उपस्तित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता मंगला मोहुर्ले, दीपक मोहुर्ले, आरती काळे, रेशमा बुगगेवार, साधना धकाते, ज्योती नांदुरकर, माधवी चार्लिक,अनिता मेश्राम, कल्पना पोंडे, सुवर्णा निखाडे, यांनी अथक परिश्रम घेतले. सौं. साधनाताई धकाते यांनी यशस्वी समारोप केला. सरते शेवटी अल्प पाहरांनंतर मधुकर राजूरकर महामंत्री पतंजली योग समिती यांनी सर्वांचे आभार मानीत कार्यक्रमाची सांगता केली..
Post a Comment (0)
Previous Post Next Post