दाताळा नदीपात्रातून अवैध रेती तस्करी जोमात प्रशासन मात्र कोमात ?

चंद्रपूर :- चंद्रपूर येथील दाताळा नदी  परिसरातील असलेली नदीचा पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करांनी दाताळा नदीत धुडगूस घातला असून दररोज मोठ्या प्रमाणात रेतीची चोरटी वाहतूक करण्यात येत आहे. रेती तस्करांचा गोरखधंदा रात्रीच्या अधांरात सुरू आहे.रामनगर,जे.बी नगर आकाशवाणी परिसरातून ही  अवैध रेतीची तस्करी केल्या जात आहे. या अवैध रेती तस्करी मुळे नदी पात्रात मोठमोठे खडे जेसीपी लावून खोदण्यात येत आहे. रेतीच्या चोराठ्या वाहतूकीकरिता तस्करांनी नदीपात्रात रस्ता तयार केला आहे. सदर रेती तस्करी रात्रीच्या अंधारात सुरू असून रेती तस्करी जोमात प्रशासन मात्र कोमात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या रेती तस्करांच्या हाफ टन ट्रॅक्टरने रात्रीचा सुमारास नागरिकाची चांगलीच झोप उडवली. आहे. जे .बी नगर रामनगर, आकाशवाणी रोड , या भागातून रात्रच्या सुमारास अवैध रेतीचा गाड्या चालत असल्याने मोठा आवाज करत या भागातून गाड्या जात असते त्यामुळे नागरिक या वाहतुकीमुळे चांगलेच परेशान असल्याचे मात्र सांगण्यात येत आहे. दाताळा  नदी पात्रातून दररोज मोठ्या प्रमाणत रेतीची अवैध उपसा होत असते प्रशासन या कडे दुर्लक्ष का करत आहे. असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे. पोलीस प्रशासना व तहसील प्रशासनाने दाताळा नदी भागात व रामनगर,जे.बी नगर, आकाशवाणी रोड,परिसरातून आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांची ग्रस्त लावावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे रात्रच्या सुमारास होणारी अवैध रेती तस्करीवर आळा बसण्याकरिता प्रशासनाने या अवैध तस्कराविरोधात आपली धडक मोहीम प्रभावी करावी अशी मागणी   या भागातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post