व. रा. स. तुकडोजी महाराज पुण्यस्मरण सोहळा उत्साहात साजरा

विश्व शांतीसाठी तुकडोजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी... ऍड. दत्ता हजारें
चंद्रपूर:- स्थानिक चंद्रपूर येथील छत्रपती नगर कुमरे लेआऊट तुकूम येथील योग वर्गाचे भव्य परिसरात दि. 4 व 5 जानेवारी 2025 ला व. रा. स. तुकडोजी महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा अर्थात सर्व संत स्मृती मानवता दिवस महोत्सव बहुसंख्य गुरुभक्तांच्या उपस्तितीत थाटामाटात पर पडला. अध्यक्ष म्हणून लाभलेले मा. ऍड. श्री. दत्ताभाऊ हजारें जिल्हा सेवा धिकारी यांनी राष्ट्र संतांनी दिलेला मानवतेचा संदेश हा जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी असून त्यांचे विचार जगासमोर मांडणे त्याचा प्रचार, प्रसार करणे तितकेच महत्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. अनेक नामवंत भजन मंडळानी भजन संध्यामध्ये उत्सपूर्त पणे भागं घेतला. या सेवा कार्याबद्दल पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. हरिदास कापटे व त्यांच्या सुविज्ञ पत्नी सौं. रेखाताई कापटे यांच्या अथक परिश्रमातून हा सोहळा साकार झाला. पूर्व जिल्हा प्रभारी पतंजली योग समिती श्री. भगवानजी पालकर यांनी योग प्राणायाम शिबीर घेतले. याप्रसंगी मा. शरदजी व्यास जिल्हा संघटन मंत्री पतंजली योग समिती यांनी अक्युप्रेशर चिकित्सा बद्दल माहिती सांगितली. ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पालखी आणि पदयात्रा काढण्यात आली. बासुरी वादक श्री. मधुकर राजूरकर यांच्या बासुरीच्या मधुर सप्तासुरांनी वातावरण प्रसन्न आणि भक्तिमय केले. ध्यानपाठ ग्रामगिता पठण श्री. श्री. धनराज चौधरी यांनी केले. ग्रामगितचार्य श्री. अण्णाजी ढवस यांचे मार्गदर्शन लाभले. श्री. दादाजी नांदनावर ग्रामगिताचार्य जिल्हा प्रचार प्रमुख यांनी प्रार्थनेच्या महत्वावार प्रकाश टाकला. मा. नगर सेवक सुरेशभाऊ पचारे यांनी राष्ट्रसंतावर मौलिक विचार मांडले. प्रबोधनकार ह. भ. प. नामदेव गुरनुले महाराज यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून संतांची महिमा वर्णन केली. ह. भ. प. श्री. मारोतराव कापटे यांनी श्रद्धांजली पर उत्कृष्ट मार्गदर्शन केले. गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. हरिदास कापटे, उमेशजी आत्राम, प्रदीप खांडरे, प्रकाश कासार्लेवर, प्रमोद बेंद्रे, सुधाकरजी श्रीपूरवार, मधुकर राजूरकर, शंकर घुसे दादा, विठ्ठल सुरसे दादा, गोटे दादा यांच्या उत्कृष्ट नियोजनातून हा भक्तिमय सोहळा पर पडला. स्व. साक्षी संजय बुरघाटे प्रतिष्टान चे मान.श्री. संजय बुरघाटे तसेच सवित्रीबाई फुले उद्यान चे अध्यक्ष श्री. सुहास कणकडालवार प्रामुख्याने उपस्तित होते. प्रस्ताविक श्री. हरिदासजी कापटे, मंच संचालन उमेश आत्राम व प्रकाश कासारलेवर यांनी तर समारोप मधुकर राजूरकर यांनी केला.
Post a Comment (0)
Previous Post Next Post