राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

चंद्रपूर :-  राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी चंद्रपूर भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्या कार्यालयामध्ये आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला महेश राऊत, बबन राऊत, अमोल मते, सचिन बोबडे, अमित गोरकार,अमन चिचमलकर, रोहित भट, बादल कोवे,यांची प्रमुख उपस्थिती होती. जगन्नाथ बाबा मठ परिसरात असलेले राहुल पावडे यांच्या कार्यालयामध्ये  राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या कार्यक्रम घेण्यात आला. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जयघोष करीत दोन्ही महान व्यक्तींना अभिवादन केले.या अभिवादन कार्यक्रमात वार्डातील कार्यकर्ते उपस्थित होते 
Post a Comment (0)
Previous Post Next Post