चंद्रपूर :- चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जनता महाविद्यालय, चंद्रपूर अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संस्थेचे सचिव डॉ. अशोक जिवतोडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसीय विशेष वार्षिक शिबिरचे आयोजन ग्राम ताडाळी येथे करण्यात आले होते.रोज सकाळी योग व प्राणायाम चे धडे स्वयंसेवकांनी घेतले सोबतच प्रात्यक्षिक केले. गावात रस्ते, गटारे व नाली स्वच्छता अभियान, रोज परिसर स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छ्ता प्रबोधनाकरीता ग्रामस्वच्छता व डिजीटल साक्षरता जनजागृती रॅली आणि जलसंवर्धन व सांडपणी व्यवस्थापन जनजागृती रॅली गावात काढण्यात आली. रॅलीमध्ये स्वयंसेवकांनी जयघोष करत हाती प्रबोधन फलक घेत लोकांना जागृत करण्यासाठी जनजागृती पर नारे दिले. 10 जानेवारी 2025 ला कार्यक्रमाचे उदघाटन झाले. शिव्यामुकत समाज अभियान उपक्राअंतर्गत डॉ. ममता ठाकूरवार, डॉ. कल्पना कवाडे राणी हिराई विद्यार्थी विकास मंच (एस.आर.एम. कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली) यांनी मार्गदर्शन कृती अभियान राबविला. सायंकाळी गावात जूनी ग्रामपंचायत चौक येथे समाजप्रबोधनपर कीर्तन कीर्तनकार साक्षी अतकरे यांनी केले. टाटा कॅन्सर हॉस्पिटल व इंडीयन रेड क्रॉस सोसायटी यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर राबविले. सत्यशोधक जीवनपट प्रश्र उत्तर स्पर्धा कार्यक्रम राबविण्यात आला आणि विजेत्या तिन विद्यार्थ्यांना समारोपीय दिवशी महात्मा फुले यांचे पुस्तक बक्षिस स्वरूप वाटप करण्यात आले. जलसंवर्धन विषयक मार्गदर्शन व कृती अभियान ग्रामपंचायत ताडाळी यांच्यसोबत राबविण्यात आले. अशाप्रकारचे कृतीपर मार्गदर्शन अभियान राबविण्यात आले. शिबिरात विविध उदबोधन वर्ग घेण्यात आले. जसे उच्च शिक्षण व कायद्याबाबत मार्गदर्शन अँड. दीपक चटप, ग्रामीण विकासात युवकांची भूमिका अविनाश पोईनकर, वन नेशन वन इलेक्शन डॉ. अनिल मोरे, आदर्श युवा हेच समाज व देशाचे भविष्य यावर मुख्याध्यापक भास्कर जीवतोडे यांनी मार्गदर्शन केले. अंमली पदार्थ मुक्त अभियान नेहरु युवा केंद्र, चंद्रपूर निकीलेश चामरे, सायबर सुरक्षा गुन्हे व उपाय योजना मार्गदर्शन रोशन इरपाते पोलीस उपनिरिक्षक, पोलीस ठाणे, पडोली आणि मुजुवर युसुफ अली सायबर हायजिन प्रॅक्टिशनर, सायबर पोलीस ठाणे, चंद्रपूर यांनी प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्य केंद्र, ताडाळी आणि ग्रामपंचायत ताडाळी ला भेट दिली. तेथील अधिकाऱ्यांनी संबंधीत विभाग बाबत आरोग्य आणि गाव विकास विषयी स्वयंसेवकांना माहिती दिली. गाव अभ्यास सर्वेक्षण करण्यात आले. शासकिय योजना तसेच विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य, नाट्य, एकपात्री, लोककला, गीत गायन आणि संगीत वादन, अश्या उपक्रमात स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. असे विविध सांस्कृतीक उपक्रम रोज राबविल्या जात होते. समारोपीय कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष डॉ.एम.सुभाष मंचावर उपस्थित होते. विशेष अतिथी डॉ. अभिलाषा गावतुरे ( प्रसिद्ध बालरोग तज्ञ) प्रामुख्याने उपस्थीत होते. सात दिवसीय शिबिराचे अहवाल वाचन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अमर बल्की यांनी केले. राष्ट्रिय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. गुरुदास बल्की यांनी स्वयंसेवकांना रासेयो शिबिर व एन. एस. एस. चे महत्व पटवून देत देशाचा जबाबदार नागरिक होण्याबाबत मार्ग सांगितले. शिवदास शेंडे यांनी गाव व राष्ट्र यांचा विकास युवा आदर्श होऊन करतील असे विचार मांडले. उपसरपंच निकिलेश चामरे यांनी स्वयंसेवकांना शिबिर शिक्षणातून जीवन घडवणुकीचे मार्गदर्शन केले. तसेच विविध बक्षिसे व सत्कार घोषित केले. प्रमुख अतिथी ग्रामपंचायत सदस्य मालती आमटे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रीती आवळे, पोलीस पाटील स्वप्नील देशमुख, तंटामुक्ती सदस्य वनमाला पेंदोर, गुरुदेव सेवा मंडळ नथूजी गोहणे, सुरेश धांडे, डॉ.के.सी.पाटील, डॉ. ए. के. महातळे, प्रा. वी. एस. बोढाले, डॉ. एन. आर. बेग, डॉ. इमॅन्युएल कोंड्रा डॉ. एम. बी. शेंडे, डॉ. जे. एल. पायघन, डॉ. दीपिका संतोषवार, डॉ. मनिषा महातळे, प्रा. एच. आर. आत्राम, प्रा. प्रितीलीपी कोल्हे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन क्रांतिवीर सिडाम आणि समीक्षा कडूकर व प्रस्तावना प्राध्यापक हृदयशाह आत्राम यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. गणेश येरगुडे यांनी केले.