भामरागड :- जगदगुरु संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्र गोडंवाना विद्यापीठाच्या वतीने संपूर्ण विद्यापीठामध्ये पाच महाविद्यालयाची निवड करण्यात आली त्यापैकी राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय भामरागड हे एक महाविद्यालय आहे. त्यासाठी स्पर्धा समन्वय म्हणून प्रा. डॉ. कैलास व्हि. निखाडे त्याची नियुक्ती करण्यात आली. या वक्तृत्व स्पर्धा मध्ये उद्घाटिका म्हणून प्रा. डॉ. कांचन धुर्वे राजे धर्मराव सायन्स महाविद्यालय अहेरी या उपस्थित होत्या. अध्यक्ष म्हणून प्रा. चिन्ना चालुरकर सर उपस्थित होते. या या स्पर्धसाठी परिक्षक म्हणून प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे सर तसेच परिक्षक म्हणून प्रा. डॉ. सुनंदा पाल राजे धर्मराव सायन्स महाविद्यालय अहेरी यांची निवड करण्यात आली. उपस्थित म्हणून प्रमुख पाहुणे प्रा. डॉ . संतोष डाखरे सर तसेच प्रा. डॉ. अतुल खोब्रागडे सर उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रास्ताविके मध्ये डॉ. कैलास व्हि. निखाडे यांनी स्पर्धेचे नियम सांगितले. वक्तृत्व स्पर्धासाठी महाविद्यालयातुन एकुण 12 विद्यार्थीयांनी सहभाग घेतला तसेच राजे धर्मराव सायन्स कॉलेज अहेरी येथील 2 विद्यार्थीनी सहभाग घेतला. या स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक कु. योगिता मुरमुरवार राजे धर्मराव सायन्स महाविद्यालय अहेरी तसेच व्दितीय क्रंमाक कु. ममता भांडेकर राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्याालय भामरागड तसेच तृतीय क्रमाक श्री. किरण कुरसामी राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय भामरागड या विद्यार्थीचा आलेला आहेत.या कार्यक्रमाचे संचालन कु. रोहणी पुंगाटी तर आभार प्रदर्शन कु. ममता भांडेकर यांनी केलेण् कार्यक्रम यशस्वीसाठी कश्री. बन्डु बोन्डे आणि श्री. सुनिल ताजणे व विद्यार्थी आणि विद्यार्थीनी परिश्रम घेतले.