बिनबा चौक येथे बिबट्याच्या शिरकाव

चंद्रपुरात मानव वन्यजीव संघर्ष पेटला
चंद्रपूर: शहरातील बिनबा चौक परिसरात आज सकाळी किशोर बोबडे यांच्या घरामागे असलेल्या झुडपात बिबट्याचा शिरकाव झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिनबा चौक क्षेत्र, जे वरदडीसाठी प्रसिद्ध आहे, येथे बिबट्याचे आगमन स्थानिकांसाठी आश्चर्याचे ठरले आहे. बिबट्याचा प्रवेश झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात मोठी गर्दी जमली आहे आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी सचिन बोरकर व पंडित यांनी प्रथम घटनास्थळी दाखल होत परिस्थितीचे नियंत्रणात ठेवली व शोधात स्वतः घेत होते .वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, बिबट्याला पकडण्यासाठी विशेष पथक सज्ज झाले आहे. बिबट्याला डॉटद्वारे बेशुद्ध करण्यात येणार आहे. वनविभागाने घटनास्थळी योग्य ती खबरदारी घेतली असून, नागरिकांना घाबरून न जाता संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.सकाळपासून बिंबा गेट परिसरात वातावरण तणावाचे झाले आहे आणि या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे. वनविभाग या घटनेची सखोल चौकशी करत असून, बिबट्याचा प्रवेश नेमका कसा झाला याची माहिती मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली असून, बिबट्याचे सुरक्षित रेस्क्यू करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आणि घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post