चंद्रपूर भाजपा अल्पसंख्यांक मोर्चातर्फे ईद-ए-मिलाद निमित्त रॅलीचे स्वागत

चंद्रपूर :- भाजप महानगर अल्पसंख्यांक मोर्चा तर्फे लोकमान्य टिळक विद्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनात व चंद्रपूर भाजप महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात मुस्लिम समाजाचे धर्मगुरू यांचे स्वागत यावेळी करण्यात आले. सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी चंद्रपूर भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा तर्फे  ईद-ए-मिलाद निमित्त रॅलीचे आईस्क्रीम व पाणी बॉटल वाटप करण्यात आले.ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम समाज बांधवांतर्फे  मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक लोकमान्य विद्यालय जवळ येताच चंद्रपूर भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा तर्फे मिरवणुकीत सहभागी मुस्लिम समाज बांधवांनचे आईस्क्रीम व पाणी बॉटल वाटप  करण्यात आले. तसेच ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा देण्यात आल्या. गांधी चौक मार्गक्रमण करीत दादमल कोहिनूर ग्राउंड येथे   मिरवणूकीचे समापन करण्यात आले.यावेळी चंद्रपूर भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे  अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष चांद सय्यद बाजार मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार रवी लोणकर सूर्यकांत कुचनकर सोहेल शेख जहीर कादरी जफर सिद्दिकी अल्ताफ शेख रफिक शेख आसिफ पठाण सलीम शेख महेश कोलावार फिरोज खान शकील शेख जाहीर रजा रफिक शेख शाहरुख खान  तरबेज पठाण अरबाज खान आसिफ पठाण व मुस्लिम समाज बांधव व भाजप पदाधिकारी मोठया संख्येत उपस्थित होते.
Post a Comment (0)
Previous Post Next Post