दुर्गापूर : पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सिनाळा गावात काल, दुपारच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. भावेश मंगेश झरकर, सहा वर्षांचा एक चिमुकला, शाळेच्या जवळच्या खुल्या परिसरात शौचालयासाठी गेला होता. त्या वेळेस, बिबट्या आपल्या पिल्ल्यांसह त्या परिसरात वावरत होता. अचानक, बिबट्याने शौचालयात बसलेल्या मुलावर हल्ला करून त्याला उचलून नेले.घटनेची माहिती मिळताच, गावातील नागरिकांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाचे डीएफओ प्रशांत खाडे यांच्या नेतृत्वात स्थानिकांनी रात्रभर मुलाचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली, मात्र रात्रीच्या काळात प्रयत्न करूनही मुलाचा पत्ता लागला नाही.आज सकाळी, कावेरी प्रायव्हेट कंपनीतील कामगार प्रज्वल गिलबिले कामावरून घरी परतत असताना, पद्मापूर सब एरिया ऑफिसजवळ बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. यानंतर बिबट्याच्या शोधासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. यावेळी, बिबट्याच्या पिल्ला एका झाडावर दिसला, पण वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तरी तो पळून गेला.बिबट्याच्या पिल्लाचा शोध घेत असताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्या मुलाचे दोन्ही हात आणि दोन पाय असा मृत्यू देह सापडला, ज्यामुळे मुलाची दुर्दशा स्पष्ट झाली. या घटनेने स्थानिक नागरिकांत संताप आणि भय पसरले आहे. संतप्त नागरिकांनी WCL सबेरीया मॅनेजरच्या ऑफिसवर गर्दी केली आणि प्रशासनाला धारेवर धरले. त्यांनी बिबट्याच्या हल्ल्यांपासून स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना न केल्यास, यापुढे अशा घटनांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने याबाबत गंभीर दृष्टीकोन ठेवून तात्काळ कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.