कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या राज्य कार्यकारिणीत डॉ. विजय हेलवटे प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार, प्रा. नामदेव मोरे यांची निवड

चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय  मराठी  विषय महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची आभासी बैठक नुकतीच प्रा. सुनिल डिसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला प्रा.  बाळासाहेब माने यांनी नविन राज्यकार्यकारिणी घोषित केली.कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघाच्या सल्लागारपदी चंद्रपूर जिल्ह्यातील  माजी प्राचार्य डॉ. विजय हेलवटे  यांची निवड करण्यात आली.  कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघाच्या उपाध्यक्षपदी महाराष्ट्र रत्न  पुरस्कार प्राप्त  प्रा. डॉ.  ज्ञानेश हटवार यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती यांची निवड करण्यात आली.   तर जनता कनिष्ठ महाविद्यालय, घुग्घुस येथील  ग्रामगीताचार्य प्रा. नामदेव मोरे यांची  चंद्रपूर  जिल्हाध्यक्षपदी निवड झाली.सदर राज्य कार्यकारिणीत कनिष्ठ महाविद्यालयीन  मराठी विषयाचे 35 जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष यांचीही निवड करण्यात आली. ही निवड जिल्ह्यातून मागविण्यात आलेल्या स्वजीवनवृत्ताच्या  व मुलाखतीच्या आधारे करण्यात आली आहे या मराठी विषय शिक्षक महासंघ या   संघटनेत  सात हजार कनिष्ठ महाविद्यालयीन  मराठी विषय शिक्षक सभासद असून सर्वांत मोठी नोंदणीकृत  संघटना आहे. सदर राज्य कार्यकारिणी ही जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर  पदाधिकारी नियुक्त करून मराठी विषयाच्या अध्यापनाच्या  समस्या, मराठी विषय शिक्षकांच्या  समस्या, मराठी विषयाचे संगोपण व संवर्धन तसेच शैक्षणिक व सामाजिक विकास करण्यासाठी विविध उपक्रम राबविणार आहे.  ही संघटना 2010 पासून कार्यरत आहे. सदर कार्यकारिणीची निवड ही तीन वर्षांसाठी असून निवड झालेले पदाधिकारी यांच्याकडून  मराठी विषय शिक्षक महासंघासाठी  विशेष कार्य करतील, असा आशावाद मराठी शिक्षकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी विषय शिक्षकांची  बांधणीसाठी सदर संघटनेची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. महाराष्ट्रात मराठी विषय इयत्ता बारावी पर्यन्त सर्व विद्याशाखेत अनिवार्य केली जावी  यासाठी ही संघटना प्रयत्न करत आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post