बोर्डा येथिल शेतकरी दांपत्याने अनुभवला लाल किल्ल्यावरील सोहळा

चंद्रपूर :- लाल किल्ल्यावरील स्वतंत्र दिन सोहळा भव्य दिव्यच असुन तो पाहताना जाज्वल्य राष्ट्रप्रेम जागृत झाल्याशिवाय राहत नाही. अशी भावूक प्रतिक्रिया बोर्डा(वलनी) येथिल प्रगतिशील शेतकरी गौतम सागोरे यांनी दिली. कृषी मंत्रालयाच्या शेतकरी कल्याण विभागाच्या वतीने नागपूर विभागातून दोन प्रगतिशील शेतकरी जोडप्यांची निवड दिल्लीतील लाल किल्ल्यावरील स्वतंत्रदिन सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित म्हणून करण्यात आली होती. यात चंद्रपूर जिल्ह्यातून एकमेव गौतम सागोरे आणि सौ. रोशंती सागोरे यांची निवड झाली होती. महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्यातील 12 शेतकरी जोडप्यांनी यात सहभाग नोंदवला. त्यात सागोरे दाम्पत्य सुद्धा होते. सागोरे हे गेल्या अनेक वर्षांपासून विष मुक्त शेती करत असुन त्यांच्या शेतात चाललेल्या कृषि पर्यटन अंतर्गत ज्वारीच्या हूर्ड्याची पार्टी अत्यंत प्रसिद्ध आहे. शेती व्यतिरिक्त त्यांचें सामाजिक कार्य सुद्धा परिसरात लोकप्रिय आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post