वायगाव-बोर्डा सिमेंट रस्त्याच्या कामात घोळ

चार महिन्यापूर्वी बांधलेला रस्ताही तडकला  तोडून नव्याने बांधकाम करण्याची गरज 
चंद्रपूर :- वायगाव-बोर्डा सिमेंट रस्त्याचे काम सद्या सुरु असुन कामाच्या सुरुवातीलाच हा सिमेंट रस्ता दबू लागल्याने ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बोर्डा शाळा समितीचे माजी अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते गौतम सागोरे यांनी या कामावर आक्षेप घेतला असुन जेवढे झाले तेवढे काम तोडून रस्ता नव्याने बनविण्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे याच ठेकेदाराने चार महिन्यापूर्वी बांधलेल्या रस्त्याला भेगा पडल्याचे पाहायला मिळत आहे.बोर्डा हा परिसर सद्या पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत आहे. या भागात वायगाव पर्यन्त रिसॉर्ट आणि फार्म हाऊस आहेत. अश्यात या ठिकाणी सिमेंट रस्ता आवश्यक आणि महत्त्वाचा मानून तशी मागणी करण्यात आली होती. ती मान्य होऊन या करिता निधी मंजूर झाला आणि कामाला प्रत्यक्ष सुरूवातही झाली. मात्र ठेकेदाराने अधिकारी वर्गावर राजकीय दडपण आणून थातुर मातुर काम करायला सुरूवात केली. रस्त्यासाठी जे खोदकाम केलें ते मुळात योग्य नाही. नुसती लिपापोती केली आहे. ल्युज ची स्थिती सुद्धा गंभीर आहे. साधारण वाहन या रस्त्यावरून गेले तरी रस्ता दबु लागला आहे. अधिकाऱ्यांना कळवले की ते येऊन निघून जातात. मात्र ठेकेदाराला जाब विचारला जात नाही. यावरून ठेकेदार आणि अधिकारी यांचे संगणमत तर झाले नसावे अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे. हा रस्ता तोडून बनविला तरच टिकेल अन्यथा काहीं दिवसातच याचे तिन तेरा झाल्याशिवाय राहणार नाहीत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते गौतम सागोरे यांनी केला आहे. याची दखल घेतली नाही तर आंदोलनं करून ठेकेदाराला जाब विचारू असा इशारा सुद्धा सागोरे यांनी प्रस्तूत प्रतिनिधी जवळ बोलताना दिला आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post