बल्लारपूरात श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आयोजन*



मुस्लिम बाधवांनी केले भव्य स्वागत


भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचा स्तुत्य उपक्रम

बल्लारपूर:- शहरात श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आयोजित करण्यात आले असून या - धार्मिक महोत्सवा निमित्र शहरामध्ये भव्य शोभा कलश यात्रा काठण्यात आली. भाजपा अल्पसंख्यंक मोर्चा जिल्हा (ग्रामीण) च्या बल्लारपूर शहर अल्पसंख्यक मोर्चातर्फे या शोभायात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले.स्थानिक नवीन बसस्थानक परिसरात शोभा कलश यात्रेत रथ वर विराजमान आचार्य पंडित मुद्रीकाप्रसाद मिश्राजी महाराज यांचे भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जनाब शेख जुम्मन रिझवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी शाल व पुष्पहार घालून स्वागत करीत. सर्वधर्म समभावाचा आदर्श घालून दिला. भारतीय राजघटने ने सर्वाच्या धर्म, संस्कृती, पूजा अर्चनेचा मान राखण्याची शिकवण व अधिकार दिला असल्याने मुस्लिम समाज बांधवांच्या या स्वागत कार्यक्रमामुळे जनसामान्यां समाधानाची व एकात्मतेची भावना व्यक्त होते.या शोभायात्रेत भाजपा नेते तथा राज्य वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल माजी नगरध्यक्ष हरिष शर्मा, अजय दुबे, काशिनाथ सिंह, निलेश खरबडे, समिर केने, मनिष पांडे, रेणूकाताई दुधे, शहरतील अनेक गणमान्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
शोभायात्रा तसेच आचार्य पंडित मुद्रीका प्रसाद मिश्रा महाराज यांचे स्वागत प्रसंगी आशिष देवतळे, शेख हुसेन, शेख युसूफ, शेख करिम, शेख अजहर, रामधन सोमानी, जगदीश गहेरवार, सोमेश खंडेलवार, आदींची उपस्थिती होती. स्वागत कार्यक्रमाच्या सफलते करिता भाजपा महिला नेत्या मिनाताई चौधरी, वैशालीताई जोशी, जयश्री मोहुर्ले, जिनत जैरून्निसा शेख, अब्दुल आबिद, सलीम बैग, नफीस अन्सारी शेख, अकतर शेख, इजी अरमान शेख, भास्कर पेन्दोर, प्रकाश दोतपल्ली, वैभव बोबडे, सय्यद जुबैर, शेख जाकीर, सुधाकर पारधी, निलेश नारमवार, सौरभ मेनकुडले, सुरज ठाकुर, वैभव झुंगरे अनुराग लांडे याचे सह भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकत्यानी परिश्रम घेतले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post