पालक व खेळाडू यांनी मानले आभार.
चंद्रपूर :- जिल्हा स्टेडियम येथे जिल्हयातील अनेक खेळाडू विविध खेळांच्या सरावासाठी पाहटे पासून येथे येतात. नुकतेच हे स्टेडियम दुरूस्तीसह खेळाडूंकरिता नव्याने सुरू करण्यात आले. मात्र या स्टेडियममध्ये असलेल्या स्केटींग ग्राऊंडवर प्रकाशदिवे अनेक दिवसांपासून नादुरूस्त अवस्थेत होते. याकडे जिल्हा क्रिडा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे अंधारातच खेळाडूंना सराव करावा लागत होता. ही बाब राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कळताच प्रकाशदिव्यांची व्यवस्था करून देण्यात आली.चंद्रपूर जिल्हा स्टेडियम सोयीसुविधांयुक्त खेळाडूंकरिता नव्याने सुरू करण्यात आले. या स्टेडियमवर विविध खेळ प्रकारांचा सराव करण्यात येतो. पहाटे पासून ते सायंकाळी अंधार पडेपर्यंत खेळाडू येथे सराव करतात, परंतु येथे असलेल्या स्केटींग ग्राऊंडवर प्रकाशदिवे अनेक दिवसांपासून नादुरूस्त अवस्थेत होते, त्यामुळे खेळाडूंना अंधारातच सराव करावा लागत होता. अंधारात सराव केल्याने दुखापत होण्याची शक्यता अधिक असते. ही बाब सुधीर मुनगंटीवार यांना कळताच त्यांनी माजी उपमहापौर राहूल पावडे यांना पाठवुन स्केटींग ग्राऊंडवर नादुरूस्त असलेले प्रकाशदिवे तथा नविन प्रकाशदिवे लवकरात लवकर सुरू करण्यासंबंधी जिल्हा क्रिडा अधिका-यांना सुचविले. स्केटींग ग्राऊंडवर प्रकाशदिवे उपलब्ध करून दिल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांचे खेळाडू व पालकांच्या वतीने आभार मानण्यात आले आहे.

