चंद्रपुरातून १० हजार नागरिक आक्रोश मोर्चाला जाणार : हसन मुश्रीफ



चंद्रपूर :- राज्य विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबर पासून नागपूर येथे सुरू होत असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिंदे - फडणवीस सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात राज्यस्तरीय आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात चंद्रपूर जिल्ह्यातून जवळपास दहा हजार नागरिक सहभागी होतील अशी माहिती जिल्ह्याचे समन्वयक तथा माजी ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी चंद्रपूर येथे पत्रकाराची बोलताना दिली तात्पूर्वी या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी जनता महाविद्यालय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली बैठकीला जिल्ह्याचे निरीक्षक प्रवीण कुडे शहर जिल्हाध्यक्ष राजू कक्कड ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके प्राचार्य अशोक जीवतोडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर ज्येष्ठ नेते एडवोकेट मोरेवर टेंभुर्डे हिराचंद बोरकुटे बाबा वासाडे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील दहेगावकर दीपक जयस्वाल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या जनविरोधी आंदोलनामुळे शेतकरी कष्टकरी यांच्यासह सर्व स्तरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप्त आहे प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाला यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले मागणी करूनही राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला नाही गुन्हेगारीचे प्रमाण वाढले अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे राज्यातले उद्योग गुजरात सह अन्य भाजपशासित राज्यात जात आहे त्यामुळे तरुण बेरोजगारात सुद्धा प्रचंड संताप आहे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 19 डिसेंबर पासून सुरू होणार आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यस्तरीय आक्रोश मोर्चा धडकणार आहे मोर्चासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून काय तयारी करण्यात आली या आढावा घेण्यासाठी जबाबदारी पक्षाने आपल्याकडे दिली आहे त्यासाठी आढावा बैठक झाले जिल्ह्यातून जवळपास ८ ते १० हजार नागरिक आक्रोश मोर्चा सहभागी होतील असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले
Post a Comment (0)
Previous Post Next Post