श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चंद्रपुर येथे सामाजिक न्याय पर्व कार्यक्रम


चंद्रपूर:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र शासन तसेच सह-आयुक्त,समाज कल्याण चंद्रपुर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.एम.डी.येरगुडे स्मृती शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपुर अंतर्गत संचालित श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चंद्रपुर येथे *सामाजिक न्याय पर्व* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ह्यावेळी संस्थेचे सचिव अमित व्ही.येरगुडे सर, समाज कल्याण विभाग चंद्रपुर चे सह-आयुक्त .अमोल यावलीकर साहेब,प्रमुख वक्ते अनिल डहाके सर,पप्पूजी देशमुख,माजी नगरसेवक,संस्थेचे प्राचार्य राजेश पेशट्टीवार तसेच सर्व निदेशक-कर्मचारी वर्ग आणि बहुसंख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अनिल डहाके सर ह्यांनी संविधानावर तसेच नागरिकांचे हक्क व कर्तव्य ह्यावर मार्गदर्शन केले आणि सह-आयुक्त यावलीकर साहेबांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले..तसेच पप्पूजी देशमुख ह्यांनी सामाजिक मार्गदर्शन करून मने जिंकली.सामाजिक न्याय पर्वाच्या अनुषंगाने संस्थेत निबंध स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या आणि विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.सर्व विजेत्या स्पर्धकांना संस्थेचे अध्यक्षा श्रीमती विद्या व्ही.येरगुडे मॅम,सचिव अमित व्ही.येरगुडे सर आणि उपाध्यक्ष अभिषेक व्ही.येरगुडे सर ह्यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन करून कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी संविधानाच्या प्रस्ताविकतेचे वाचन करण्यात आले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन/आभार संस्थेचे निदेशक प्रवीण लांजेवार ह्यांनी केले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post