पडोली चौकात डिझेल चोरटे सक्रिय



ट्रक टैंकर निर्जनस्थळी नेवून होते डिझेल चोरी

चंद्रपूर :-  येथील पडोली चौक ते ताडळी टी पॉईंट या परिसरात मोठ्या प्रमाणात डिझेल तस्करी करीत होत असल्याची या भागात चर्चा रंगली आहे.डेपोतून बाहेर पडणाऱ्या ट्रक मधून डिझेलची चोरी होत असल्याने या परिसरात डिझेल चोरटे सक्रिय झाले आहे. डेपोतून रोज ट्रक भरून बाहेर पडतात या ट्रकच्या भरतीवेळी व सप्लायर करत असताना तांत्रिकी गोष्टी द्वारे डिझेलची चोरी केली जात आहे. डिझेल ट्रक टँकर डेपोतून बाहेर पडल्यानंतर ते डेपोतून जवळच असलेल्या निर्जनस्थळी नेऊन त्यातील डीजल चोरून नेत असल्याचे बोलले जात आहे. परस्पर मोठमोठ्या टँकर मधून डिझेल काढून ते इतर ठिकाणी छुप्यापद्धतीने दुसऱ्यांना विकून बक्कळ मोबदला मिळविला जात आहे. परंतू, या डिझेल चोरीमागे पडोली चौकामधूनच धागेदोरे लागले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान डिझेल माफिया म्हणून यांची आज या परिसरात ओळख सुद्धा आहे. हाकेच्या अंतरावर या ठिकाणी पोलीस ठाणे असतांना या डिझेल माफियांवर कधी कारवाई का होत नाही, असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. सदर डिझेल माफिये चिरीमिरी देऊन परस्पर आपला व्यवसाय या भागात चालवित असल्याची चर्चा आहे. यावर आळा का घालतला जात नाही असाही प्रश्न विचारण्यात येत आहे. रात्रीच्या वेळीच टँकर मधून डिझेल काढून परस्पर तस्करी होत असल्याचे येथे दिसून येत आहे. मात्र पडोली पोलीस आता यावर काय कारवाई करतात, याकडे या भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post