वरोरा :- आनंदवन चौक कडून रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या लागून असलेल्या तीन दुकाने चोरट्याने एकाच रात्री फोडली तर त्याच्या एका दिवसाआधी रात्री बिअर बार फोडून छोट्याने इंग्लिश दारूच्या बाटल्या पळविल्याची घटना घडली वरोरा परिसरात सातत्याने घरफोडी होताना दिसून येत आहेत बहुतांश ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असूनही चोरटे गवसले जात नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे आनंदवन चौकाकडून रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेले महाराष्ट्र फोटो स्टुडिओ एन एस कलेक्शन व ब्युटी पार्लर अशी तीन दुकानाचे शटर अज्ञान चोरट्यांनी फोडले या तिन्ही दुकानातून फारशी रोकडे गेलेली नसल्याने समजते परंतु दुकानातील साहित्य चोरटे घेऊन गेले या घटनेच्या एका दिवशीपूर्वी नागपूर चंद्रपूर मार्गे लागत रत्नमाला चौक जवळच्या बिअर बार मध्ये रात्री चोरट्याने चोरी करून इंग्लिश दारूच्या बाटल्या लांबविल्या हे विशेष
