चंद्रपूर :- भारतीय जनता युवा मोर्चाचे महानगर महामंत्री प्रमोद क्षिरसागर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वा.च्या कालावधीत स्थानिक सपना टॉकीज चौक, हनुमान मंदिर चंद्रपूर येथे सावंगी मेघे येथील तज्ञ डॉक्टरांच्या चमूद्वारे भव्य आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात मेडिसीन तज्ञ रक्तदाब, बरेच दिवसाचा ताप, किडनीचे आजार, ह्रदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे इत्यादी. नेत्ररोग तज्ञांद्वारे डोळ्यांचे सर्व आजार, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपण आदींवर, सर्जरी तज्ञ, हायड्रोसिल, हर्निया, अंगावरील गाठी, आतड्याचे आजार, पोटाचे आजार, गलगंड आदींवर, स्त्रीरोग तज्ञांद्वारे मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे, महिलांचे आजारांवर उपचार करतील. तसेच अस्थिरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, बालरोग तज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ, श्वसन रोग आदी विविध गंभीर आजारांवर दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थान येथील तज्ञ डॉक्टरांच्या चमूद्वारे तपासणी करून रोगनिदान करण्यात येईल. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन भाजयुमो महानगर महामंत्री प्रमोद क्षिरसागर व मित्र परिवाराने केले आहे.
